eknath shinde  esakal
महाराष्ट्र बातम्या

सावित्रीबाई फुलेंबद्दल 'इंडिक टेल्स'मध्ये आक्षेपार्ह लिखाण; CM शिंदेंचे कडक कारवाईचे निर्देश

रुपेश नामदास

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण इंडिक टेल्स या वेबसाइटवर प्रसिद्ध झाल्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केले आहे. तर मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून इंडिक टेल्स या वेबसाइटवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तर या प्रकाराचा निषेध करत राज्य सरकारनं या प्रकरणात भूमिका घेण्याची मागणी करण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील तसेच दिग्गज नेत्यांकडून कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत. सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या 'इंडिक टेल्स' वेबसाइटवर कारवाईचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईट वरील आक्षेपार्ह मजकूर तपासून कारवाई करण्याचे निर्देश मुख्य सचिव मनोज सौनिक दिले आहेत.

'इंडिक टेल्स' या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अनेक आक्षेपार्ह लिहिलं आहेत. या लिखाणाबाबत अनेक सामाजिक संस्थांनी, राजकीय नेत्यांनी सरकारकडे आक्षेप नोंदवले आहेक. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान महाराष्ट्र CMO वर ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे की, 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या 'इंडिक टेल्स' या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. 'इंडिक टेल्स' या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत.

याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे, तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थांनी घेणे गरजेचे आहे. 'इंडिक टेल्स' वरील लेखात आक्षेपार्ह बाबी असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT