deepak kesarkar esakal
महाराष्ट्र बातम्या

गोगावलेंच्या विधानावर केसरकरांची सावरासावर; म्हणाले, 'यापुढे...'

सकाळ डिजिटल टीम

Deepka Kesarkar On Bharat Gogawale : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गट आणि शिवसेनाचा वाद सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. यावर आद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. मात्र, त्यापुर्वी शिंदे गटातील नेते भरत गोगावले यांनी एक विधानं केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या या विधानावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण देत सावरासावर केली आहे.

सुप्रीम कोर्टातील संघर्ष पाच वर्षे चालेल तोवर धनुष्यबाण निशाणीवर आम्हीच निवडणून येऊ असा दावा शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर आता केसरकरांनी सावरासावर करत कोर्टाच्या प्रक्रियेबाबत भाष्य करणं चुकीचं अस ल्याचे म्हणत हा वाद सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

केसरकर म्हणाले की, सुप्रीम कोर्टमध्ये किंवा कोणत्याही कोर्टामध्ये ज्यावेळी एखाद्या प्रकरणावर सुनावणी सुरू असते. त्यावेळी आमच्या पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने किंवा आमदाराने कोणत्याही प्रकारचं विधान करायचं नाही हे आधीच निश्चित झालेलं आहे. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचनादेखील दिल्या आहेत. मात्र, त्यानंतरही अनावधानाने गोगावले यांनी विधान केले आहे.

ते ज्याप्रमाणे बोललं आहेत तशी कोणतीही भूमिका पक्षाची नाही तसेच याबाबत कोणतही स्टेटमेंट पक्षाकडून देण्यात आलेले नाही. तसेच कोर्टातील प्रकरणांवर निकाल येण्यासाठी वेळ लागतो असे कोणतीही म्हणण आमच्या पक्षाचं नसल्याचे केसरकरांनी स्पष्ट केले आहे. तसेच यापुढे न्यायालयाच्या कामकाजाबद्दल शिंदे गटातील पदाधिकारी किंवा आमदार बोलणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी 75 एकर जागेचा मार्ग मोकळा! निवृत्त सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत कार्यक्रम; 16 ऑगस्टला होणार मोठी घोषणा?

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : बावनकुळेंचे स्वातंत्र्यदिनी विकसित महाराष्ट्राचे आवाहन

SCROLL FOR NEXT