Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

...ही बंडखोरी नाहीच! शिंदे गटाच्या बाजूने हरीश साळवेंचा युक्तिवाद

या प्रकरणी १ ऑगस्ट रोजी पुढची सुनावणी होणार आहे.

वैष्णवी कारंजकर

देशासह राज्याचं लक्ष लागून असलेल्या शिंदे ठाकरे वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आमचीच शिवसेना खरी, आमदारांची अपात्रता, पक्षांतर बंदी कारवाई अशा अनेक मुद्द्यांवरुन हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. शिवसेनेच्या अस्तित्वाच्या या प्रश्नाला आता न्यायालयाने लांबणीवर टाकलं आहे. (Shivsena Uddhav Thackeray EKnath SHinde in Supreme court)

या प्रकरणी १ ऑगस्ट रोजी पुढची सुनावणी होणार आहे. तोपर्यंत राज्यातली परिस्थिती जैसे थेच असावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. २७ जुलैपर्यंत दोन्ही बाजूंनी प्रतिज्ञापत्र सादर करावे, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या समर्थकांच्या गटाच्या बाजूने हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला आहे.

शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या युक्तिवादातले महत्त्वाचे मुद्दे:

१. पक्षाला दुसरा नेता हवा असेल तर त्यात चुकीचं काय?

२. पक्षात राहून एखाद्या नेत्याविरुद्ध आवाज उठवणं म्हणजे बंडखोरी नव्हे.

३. पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात सामील होणं ही बंडखोरी.

४. यापूर्वी पक्षांतर्गत बाबींमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप केलेला नव्हता.

५. पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यासाठी तक्रार करणं आवश्यक

६. दहाव्या सूचीनुसार, कारवाई होण्यासाठी पक्ष सोडावा लागतो.

७. पक्ष सोडला तरच पक्षांतरबंदी कायदा लागू होतो.

८. व्हीपचं उल्लंघन केलं असेल तर पक्षांतरबंदी कायदा लागू होतो.

९. २० आमदारांचाही पाठिंबा नसलेल्या नेत्याला मुख्यमंत्रिपदी कसं राहता येईल?

१०. लक्ष्मणरेषेचं उल्लंघन न करता आवाज उठवणं ही बंडखोरी नव्हे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रेकिंगला जाते सांगून लोणावळ्याला गेली; मुंबईत LLB करणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा ४०० फूट खोल दरीत आढळला मृतदेह

Pune News: पुणे बनणार संरक्षण अर्थकारणाचे संशोधन हब: जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, सांगवीत ‘एनएडीएफएम’च्या संकुलाची उभारणी!

Latest Marathi News Live Update : भारतावरील आयातशुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्के करणार; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Pune News: टायगर पॉइंट दरीत आढळला तरुणीचा मृतदेह; नवी मुंबईच्या श्रेया पती यांचा मृत्यू, लोणावळ्यात नेमकं काय घडलं!

Ajit Pawar Plane Crash : विमान अपघातानंतर अजित पवार यांची ओळख घड्याळामुळे नव्हे तर दुसऱ्या कारणामुळे पटली; पोलिस सुत्रांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT