Farmer 
महाराष्ट्र बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी : मुदतवाढीतही शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळणार!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पीककर्ज परतफेडीसाठी दिलेल्या मुदतवाढीनुसार येत्या ३० मेपर्यंतचा व्याजाचा केंद्राचा हिस्सा केंद्र सरकार देणार आहे. त्यामुळे परतफेडीसाठी दिलेल्या मुदतवाढीच्या कालावधीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळेल, असे सहकार उपनिबंधक दिगंबर साळुंखे यांनी सांगितले.            

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने पीककर्ज परतफेडीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीनुसार येत्या ३० जूनपर्यंत कर्जाची परतफेड करता येणार आहे. मात्र या मुदतवाढीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळणार की नाही, याबाबत पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम आता दूर झाला आहे.

पीककर्जासाठी केंद्रीय आणि राज्य सरकारमार्फत व्याजात सवलत देण्यात येते. या सवलतीच्या रकमेचा आपापला हिस्सा अनुक्रमे केंद्र आणि राज्य सरकार देत असे. त्यामुळे मुदतवाढीत हा हिस्सा मिळणार की नाही, हे स्पष्ट नव्हते. परंतू नियमानुसार केंद्र सरकार या कर्जावरील व्याजाच्या सवलतीचा ३१ मेपर्यंतचा हिस्सा भरेल, असे केंद्राने सहकार खात्याला पत्राद्वारे कळविले आहे. नियमानुसार केंद्राने हिस्सा दिला की राज्यालाही तो द्यावाच लागतो.          

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा वगळल्यानंतर केवळ चार टक्के व्याज दर आकारला जातो. या दरानुसार होणारे व्याज हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (पीडीसीसी) स्वनफ्यातून भरत असते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज हे शून्य टक्के व्याजाने मिळते. मात्र याचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी ३१ मार्चपर्यंत परतफेड करणे अनिवार्य असते.              

एक महिन्याच्या व्याजाचा संभ्रम कायम

दरम्यान, मुदतवाढ ही ३० जूनपर्यंत दिलेली असून, व्याजाची सवलत मात्र ३१ मेपर्यंतच देणार असल्याचे केंद्र सरकारने कळविले आहे. त्यामुळे जून महिन्याचे म्हणजेच या एक महिन्याचे व्याज कोण भरणार, याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT