महाराष्ट्र

केतकी चितळे प्रकरणातील राड्यात 'या' महत्वाच्या बातम्या तुमच्याकडून मिस तर नाही झाल्या? वाचा एका क्लिकवर

सकाळ डिजिटल टीम

या मोठ्या घडामोडींच्या दरम्यान अनेक महत्वाच्या बातम्या मागे राहिल्या आहेत..

अभिनेत्री केतकी चितळे हिने राज्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. केतकी चितळेच्या या वक्तव्यामुळं सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. तिने शेअर केलेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनेत्री चितळेवर कारवाईची मागणी केली. या प्रकरणी मुंबईच्या कळंबोलीतून तिला ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरा तिचा ताबा ठाणे पोलिसांनी घेतला आणि तिला अटक करण्यात आली. दरम्यान, या मोठ्या घडामोडींमध्ये अनेक बातम्या मागे राहिल्या आहेत. त्या बातम्या आपण आज पाहणार आहोत...

आसाममध्ये पूर, सुमारे 57 हजार नागरिकांना फटका

पावसाळ्यापूर्वीच आसाममध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक आलेल्या या पुरामुळे नागरिकांची स्थिती बिकट झाली आहे. आसाम राज्यातील 7 जिल्ह्यांत 57 हजार लोकांना या पुराचा फटका बसला असून अधिकृत माहितीनुसार सुमारे 222 गावे या पुराच्या पाण्याखाली आहेत. राज्यातील एकूण 10321.44 हेक्टर शेतजमीन पुरात बुडाली असल्याची माहिती मिळत आहे. या पुरामुळे आतापर्यंत एका लहान मुलासह तिघांना जीव गमवावा लागला आहे. या आपत्तीत आतापर्यंत 202 घरांचे नुकसान झाले आहे.

चीन विरोधात भारतीय लष्कराच्या 6 तुकड्या तैनात

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी अलीकडेच त्यांच्या लडाख सेक्टरच्या भेटीदरम्यान चीनकडून भारताला असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. यादरम्यान चीनमुळे तयार झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्कराने LAC वर सहा तुकड्या तैनात केल्या आहेत. त्यात सुमारे 50 हजार सैनिक आहेत. या तुकड्या पूर्वी पाकिस्तानी आघाडीवर आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी तैनात करण्यात आल्या होत्या.

राज्यातील 9 जिल्ह्यांना येलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह पाऊस

यंदा मान्सून वेळेआधीच केराळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या काही तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. 'असनी' चक्रीवादळ निवळले असून त्यामुळे मान्सूनला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मान्सूनच्या या पार्श्वभूमीवर केरळसह दक्षिण भारतातील काही राज्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. महाराष्ट्रातीलही नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पत्नीने लैंगिक संबंधांसाठी नकार द्यावा? भारतीय पुरुष म्हणतात...

वैवाहिक बलात्कार हा गुन्हा मानला जावा की नाही, हा विषय सध्या तापलेला असतानाच दुसरीकडे एका सर्वेक्षणातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून (National Family Health Survey) समोर आलेल्या माहितीनुसार, पत्नी थकलेली असेल तर तिने आपल्या पतीला लैंगिक संबंधांसाठी नाही म्हणणं योग्यच आहे, असं बहुतांश पुरुषांचं मत आहे.

टीव्ही, फ्रीज महागणार?

टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रीजसारख्या घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती मेच्या अखेरपर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पाच टक्के महागण्याची चिन्हे आहेत. कारण उत्पादकांचा उत्पादन खर्च वाढला असून आता ते त्याचा बोझा ग्राहकांवर टाकत आहेत. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचे हे परिणाम असून उत्पादकांना वस्तूंसाठीचा कच्चा माल आयात करणे आता अधिक महागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

Latest Marathi News Live Update : 'भाजप उमेदवार म्हणतायत संविधान बदलू, मात्र मोदी..'; काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

SCROLL FOR NEXT