Devendra Fadnvis sakal
महाराष्ट्र बातम्या

अडीच वर्षात पाच वर्षांची काम करायचीत; फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला

बावनकुळे यांच्या सत्कार समारंभात फडणवीस कार्यकर्त्यांशी बोलत होते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आपल्याकडे आता अडीच वर्षांचा कालावधी आहे, त्यामुळं या काळात पाच वर्षांची काम करायची आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभात फडणवीस कार्यकर्त्यांशी बोलत होते. (Five years of work should be done in two and a half years Devendra Fadnavis advice to BJP Workers)

फडणवीस म्हणाले, आता आपलं सरकार आलं आहे. एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री आहेत मी उपमुख्यंत्री आहे. आपल्याकडील अडीच वर्षे निघून गेली आहेत. आता पुढील अडीच वर्षात पाच वर्षांची धाव आपल्याला घ्यायची आहे. तसेच महाराष्ट्राची जी घडी विस्कळीत झाली होती. ज्या महाराष्ट्रात भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचारांची मालिका सुरु झाली होती. ती मालिका थांबवून पुन्हा एकदा महाराष्ट्राला ट्रॅकवर आणून वेगानं तो धावला पाहिजे, हा प्रयत्न आपला आहे.

मागच्या काळात शेतकऱ्यांवर आपत्ती आली तरी सरकार घोषणा करायचं पण पैसे देत नव्हतं. पण आपल्या सरकारनं एनडीआरएफच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय आपण घेतला. आपलं सरकार आलेलं आहे आता सर्व अन्याय दूर करायचे आहेत. बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपचा मोठा विस्तार होईल, असा विश्वासही फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला. बावनकुळे हे ऊर्जामंत्री असताना त्यांनी या खात्याला न्याय दिला होता. आता प्रदेशाध्यक्षपदाला ते न्याय देतील असंही ते म्हणाले.

महाराष्ट्रात भाजपनं लोकाभिमुखता आधुनिकता दिली. नंतरच्या काळात मलाही प्रदेशाध्यक्षपदाचा सन्मान मिळाला. तत्पूर्वीच विदर्भाचे सुपूत्र असलेल्या सुधीर मुनगंटीवार, भाऊसाहेब फुंडकर आणि आता चंद्रशेखर बावनकुळे यांनाही मिळाला, असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Crime: नांदेडमध्ये मध्यरात्री तलवारी खंजरने हल्ला; २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून

Mahavitaran Recruitment : विद्युत सहाय्यक पदासाठी प्रतीक्षा यादी जाहीर; ६ व ७ नोव्हेंबरला कागदपत्रांची पडताळणी

Kolhapur Election : 'पदवीधर'ची बाजारात 'तुरी', महायुतीत वादाची 'धुरी'; मंत्री चंद्रकांत पाटील-हसन मुश्रीफ यांच्यात रंगला राजकीय कलगीतुरा

Raju Shetti: ‘दालमिया’कडून एफआरपीमध्ये मोडतोड: राजू शेट्टी : उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

Latest Marathi News Live Update : अफगाणिस्तानात ६.३ तीव्रतेचा भूकंप, ७ जणांचा मृत्यू, भारतापर्यंत जाणवले भूकंपाचे धक्के

SCROLL FOR NEXT