Shivsena leader Sanjay Raut's Four member corona positive  esakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कुटूंबातील 4 जण कोरोना पॉझिटिव्ह

Corona updates: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नीसह ४ जणांचा कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील नेते मंडळींमध्ये आणि त्यांच्या कुटूंबीयांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरातील 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र स्वतः संजय राऊत यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली नसल्याचे कळतंय. परंतु त्याच्या कुटूंबातील (Sanjay Raut Family) ४ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.गेल्या काही दिवसांपासून देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात 58 हजार रुग्णांची वाढ झाली आहे. संजय राऊत यांच्या आई, त्यांची पत्नी, मुलगी आणि पुतणीला कोरोना ची लागण झाली आहे. घरातील सदस्यांना सर्दी ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे या सर्वांची टेस्ट करण्यात आली ज्यामध्ये हे चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले . या सर्वांना सौम्य लक्षणे असल्यामुळे सध्या तरी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

महत्त्वाचे म्हणजे या लाटेतून नेतेमंडळी आणि त्यांचे कुटूंबीयही सुटू शकले नाहीत. संजय राऊत दिल्लीत सध्या दिल्लीत आहेत. ते स्वतः मात्र कोरोना पॉझिटीव्ह नसल्याचे कळतंय. दरम्यान अलीकडील काही दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील 13 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यातील जवळपास 72 आमदारांना (MLA) कोरोनाची लागण (Corona Positive) झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यानंतर भाजपचे खासदार सुजय विखे पाटील आणि नंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले होते.

कोरोनानंतर (Covid19) आता ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरीअंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निर्बंध लावले जात आहेत. लग्न सोहळे, राजकीय सभा आणि गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या संसर्गामुळे राज्य सरकारने नुकतेच कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र मागच्या काळात झालेल्या राजकीय मंडळींच्या लग्न सोहळ्यांमध्ये अनेकजण कोरोनाबाधित झाले आहेत.

सुरुवातीला आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासोबतच आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याव्यतिरिक्त राज्यातील 72 आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: फसवणूक, रम्मी व्हिडीओ, वादग्रस्त वक्तव्य अन् कोर्टाचा दणका! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, पण हे न मिटणारे डाग...

किल्लेदारांच्या अपघातामागचा खरा सूत्रधार अखेर उघड होणार! ठरलं तर मग मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक आनंदी पण....

Latest Marathi News Live Update : अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील - आमदार अमोल मिटकरी

दुर्दैवी घटना! 'अकोलेत विहिरीत पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू', नातेवाईंकाकडून घातपाताचा संशय..

मेस्सीवर कोट्यवधींची उधळण, भारतीय फूटबॉलकडे पाठ... गुंतवणुकीची कुणाची इच्छा नाही; भारताच्या कर्णधारानं व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT