Congress State President Nana Patole esakal
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole : सांगलीत चार साधूंना बेदम मारहाण; पटोले म्हणाले, आता 'हे' कोणाला तोंड दाखवतील

मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून चौघा साधूंना बेदम मारहाण केलाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

सकाळ डिजिटल टीम

मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून चौघा साधूंना बेदम मारहाण केलाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Nana Patole News : मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून चौघा साधूंना बेदम मारहाण केलाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी हा प्रकार घडलाय. उत्तर प्रदेशमधील लवंगा या ठिकाणी आलेल्या चौघा साधूंना चोर समजून ग्रामस्थांनी ही मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. सुदैवानं पालघर सारखी घटना होता-होता टळली आहे. या घटनेची नोंद उमदी पोलिस ठाण्यामध्ये झाली आहे.

दरम्यान, या घटनेचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी निषेध नोंदवलाय. ते म्हणाले, राज्यात आता कोणत्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाहीय. साधूंवर अशा प्रकारे अन्याय होत असेल, तर आता हे (सरकार) कोणाला तोंड दाखवतील, असा टोला त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावलाय. ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. राज्यात मलाईचे खाते घेण्यासाठी चढाओढ सुरु असून राज्याला अद्याप पालकमंत्री दिले गेले नाहीत. ह्या सरकारला कुठलीही काळजी नाहीय. त्यांना (एकनाथ शिंदे) मोदी-शाहांचे हस्तक बनायला आवडतं आणि राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडायला, असं सांगत पटोलेंनी सांगलीत झालेल्या घटनेचा काँग्रेसतर्फे निषेध नोंदवला.

जत तालुक्यातल्या उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लवंगा इथं चौघा साधून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील चौघे साधू हे कर्नाटकला देवदर्शनासाठी आले होते. त्यानंतर ते विजापूरहून जत तालुक्यातल्या लवंगा मार्गे पंढरपूर या ठिकाणी देवदर्शनासाठी निघाले होते. यावेळी या चौघा साधूंनी रात्रीच्या सुमारास लवंगा गावातल्या एका मंदिरामध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर सकाळी हे चौघेही साधू गाडीतून निघाले असता, एका मुलाला त्यांनी रस्ता विचारला, त्यातून काही ग्रामस्थांना ही मुलं चोरणारी टोळी असल्याचा संशय आला. यानंतर ग्रामस्थांनी या साधूंकडं चौकशी करायला सुरुवात केल्यानंतर साधू आणि ग्रामस्थांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. यातून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी साधूंना गाडीतून बाहेर काढून बेदम मारहाण केली. त्यांना लाठी-काठी आणि पट्ट्यानं जबर मारहाण करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पैसे, रेशनसाठी आईनंच लेकीला विकलं; ७० वर्षीय वृद्धाचा १० वर्षीय चिमुकलीवर २ वर्षांपासून अत्याचार

LPG Price Cut : ‘एलपीजी’च्या किमती कमी झाल्या! , आजपासून गॅस सिलिंडरचे दर बदलले

Latest Marathi News Live Update : मराठी भाषकांवर अन्याय, बेळगाव सीमाभागात आज काळा दिन पाळला जाणार

Dev Uthani Ekadashi 2025: देवउठणी एकादशीला 'या' वस्तू दान केल्यास भगवान विष्णूची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील

रोहित आर्याने १७ मुलांना जमवलं कसं? गोळी झाडली की नाही? एन्काउंटरबाबत मोठे अपडेट समोर

SCROLL FOR NEXT