GaneshUtsav2023:  sakal
महाराष्ट्र बातम्या

Ganesh Visarjan Holiday: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीही सुट्टी जाहीर; राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय

गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलादची गुरुवारी सरकारी सुट्टी आहेच पण शुक्रवारी देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : अनंत चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जन उद्या गुरुवारी पार पडणार आहे. याच दिवस ईद-ए-मिलाद हा सण देखील आहे. पण ईद दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचं मुस्लीम समुदयानं जाहीर केलं आहे. त्यामुळं गुरुवार अनंत चतुर्दशीची सार्वजनिक सुट्टी आहेच पण आता शुक्रवारी ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळं गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सार्वजनिक सुट्टी असणार आहे. (Ganesh Visarjan Holiday on 29 September 2023 decision of Maharashtra government)

मुख्यमंत्री कार्यालयानं याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी, २८ सप्टेंबर होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचं योग्य व्यवस्थापन करणं पोलीस प्रशासनाला शक्य व्हावं म्हणून शुक्रवारी २९ तारखेला शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे.

शिष्टमंडळाची विनंती मान्य

ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळानं यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचं वातावरण असावं आणि गर्दी तसेच मिरवणुकांचं नियोजन करता येणं पोलिसांना शक्य व्हावं म्हणून २९ तारखेला सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान आदींचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT