fadnvis
fadnvis 
महाराष्ट्र

अमरावती हिंसाचार : सरकारकडून होतेय एकतर्फी कारवाई - फडणवीस

Amit Ujagare (अमित उजागरे)

अमरावती : अमरावती हिंसाचारप्रकरणी राज्य सरकारकडून एकतर्फी कारवाई होत आहे. यामध्ये १२ नोव्हेंबर रोजी घडलेलं त्रिपुरातील फेकन्यूज प्रकरण डिलीट करुन १३ तारखेला अमरावती हिंसाचारप्रकरणी ज्यांचा याच्याशी संबंध नाही अशा हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट केलं जात आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस आज अमरावतीला दौऱ्यावर आहेत. सकाळी शहरात दाखल झाल्यानंतर त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहाणी केली. हनुमाननगर, मसानगंज या भागाची तसेच खासगी रुग्णालयाची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिक आणि व्यापाऱ्यांशी देखील चर्चा केली. त्यानंतर अमरावतीच्या विभागीय कार्यालयाला जाऊन अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत हिंसाचारप्रकरणावर भाष्य केलं.

फेकन्यूजच्या आधारे कट रचला गेला - फडणवीस

फडणवीस म्हणाले, "अमरावतीतील घटना अत्यंत दुर्देवी आहे. १२ तारखेला जो मोर्चा निघाला तो चुकीच्या माहितीच्या आधारे जाणीवपूर्वक राज्यभरात कारस्थान करुन राज्याच्या विविध भागांमध्ये निघालेल्या मोर्चांपैकी एक मोर्चा होता. त्रिपुरामध्ये ज्या घटनाच घडल्या नाहीत. त्या घटनांचे सोशल मीडियावर फेक क्रिएटिव्ह तयार करुन त्यातून त्रिपुरात अल्पसंख्यांक समाजावर हल्ला झालाय, मशिदी तोडण्यात आल्या आहेत, अशा प्रकारचं फेकन्यूज तयार करण्यात आली. या गोष्टीचा पर्दाफाशही झाला आहे. जी मशिद जळताना दाखवली आहे ती, सीपीआयएमचं एक कार्यालय होतं ज्याला आग लागली होती त्याचे फोटो होते. कुराण जाळताहेत असं दाखवण्यात आलं ते दिल्लीच्या एका कॅम्पमध्ये आग लागली होती तिथला तो फोटो होता. काही रोहिंग्यांचे फोटो होते. काही पाकिस्तानातील एका शहरातील फोटो होते. यावरुन देशभरात जाणीवपूर्वक एक नरेटिव्ह तयार करण्यासाठी समजाला भडकवण्यात आलं. आमचं स्पष्ट मत आहे की, इतके मोठे मोर्चे राज्यांच्या विविध भागात निघतात हे काही आत्ता ठरवलं आणि लगेच मोर्चे निघाले असा प्रकार नाही. हे योग्य प्रकारे नियोजन करुन काढलेले मोर्चे आहेत. नांदेड, मालेगाव, अमरावती किंवा राज्यातील इतर भागांमध्ये एकाच वेळी हे मोर्चे निघाले. म्हणून पहिल्यांदा याची चौकशी झाली पाहिजे की फेकन्यूजच्या आधारावर या मोर्चांचं नियोजन कोणी केलं. त्यांची यामागणी भूमिका काय होती. महाराष्ट्रात अशांतता पसरली पाहिजे या मानसिकतेतून केलेला हा मोठा कट होता का? याचीही चौकशी झाली पाहिजे. त्यातलाच एक भाग म्हणून १२ नोव्हेंबरला एक मोर्चा अमरावतीला निघाला. याला परवानगी होती की नाही त्याला परवानगी कोणी दिली होती याची चौकशी केली पाहिजे."

हिंदुत्ववादी संघटना आणि समाजाला टार्गेट केलं जातंय

या मोर्चांनंतर परतीच्यावेळी समाजकंटकांनी ज्या प्रकारे दुकानं टार्गेट केली. लोकांना टार्गेट केलं आणि यातून दंगा घडवायचा होता म्हणूनच यातून विशिष्ट धर्माची दुकानं आणि व्यापाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. यानंतर मोठ्या प्रमाणावर अमरावतीची परिस्थिती बिघडली. १३ नोव्हेंबरला जी घटना घडली ती १२ नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेची प्रतिक्रिया होती. पण आता राज्य सरकार, सरकारमधले अधिकारी अमरावती जिल्ह्यातील मंत्री, पालकमंत्री हे सगळे १२ तारखेची घटना डिलीट करुन केवळ १३ तारखेची घटना ही जणू एकच घटना घडली आहे, अशा प्रकारचं चित्र तयार करत आहेत, जे चुकीचं आहे. १२ तारखेची घटना डिलीट करता येत नाही. म्हणून आता जी सर्व कारवाई चाललेली आहे ती १३ तारखेच्या हिंसाचाराच्या घटनेवर सुरु आहे. १२ तारखेच्या घटनेवर कुठलीही कारवाई होताना दिसत नाहीए. यावर एकही सरकारमधील पक्षाचा नेता बोलायला तयार नाही. चुकीच्या घटनेसाठी जर लांगुनचालन होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. त्यामुळे एकतर्फी कारवाई करणं हे देखील योग्य नाही. यामध्ये भाजपच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना अटक होत आहे, आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली जात आहे. एकाच घटनेसाठी विविध पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केल्या जात आहेत, असा गंभीर आरोपही यावेळी फडणवीस यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT