Software
Software 
महाराष्ट्र

सॉफ्टवेअर निर्यातीचा आलेख चढता

सकाळ वृत्तसेवा

राज्यातून ८६ हजार कोटींची निर्यात; मंदीचा परिणाम नाही
पिंपरी - मंदीचा परिणाम आयटी उद्योगावरही होत असल्याची चर्चा कानावर येत असली, तरी २०१८-१९ या वर्षामध्ये राज्यातून ८६ हजार कोटी रुपयांची सॉफ्टवेअर निर्यात झाली आहे. 

गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये यंदाच्या निर्यातीमध्ये १० हजार कोटींनी वाढ झाल्याचे सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाचे संचालक संजयकुमार गुप्ता यांनी सांगितले. सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये होणारी ही वाढ २०२० मध्येही कायम राहणार असून, त्यामध्ये चांगली वाढ अपेक्षित असल्याची शक्‍यता गुप्ता यांनी वर्तवली आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आतापर्यंत देशाची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे या क्षेत्रात जागतिक बाजारपेठेत देशाचा हिस्सा सातत्याने वाढत आहे. त्याचाच परिणाम म्हणून सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये चांगली प्रगती होताना दिसत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आघाडीच्या अनेक कंपन्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. सॉफ्टवेअर निर्यातीच्या क्षेत्रात राज्याचा क्रमांक दुसरा लागत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला आवश्‍यक असणारे कुशल मनुष्यबळ देशात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे कंपन्यांना त्याचा सर्वाधिक फायदा होत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी पार्ककडे ६००पेक्षा अधिक कंपन्यांची नोंद आहे. या कंपन्यांकडून निर्यात केली जाते. गतवर्षी अमेरिका, युरोप व अन्य देशांमध्ये सर्वाधिक सॉफ्टवेअर निर्यात करण्यात आली.
- संजयकुमार गुप्ता, संचालक, सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT