Gunaratna Sadavarte esakal
महाराष्ट्र बातम्या

कोल्हापूर: सदावर्तेंना पाच दिवसांची पोलीस कोठडी

गुणरत्न सदावर्तेंना कोल्हापूर सत्र न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

सकाळ डिजिटल टीम

गुणरत्न सदावर्तेंना कोल्हापूर सत्र न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 25 एप्रिलपर्यंत गुणरत्न सदावर्तेंना (Gunaratna Sadavarte) पोलीस कोठडीत (Police Custody) राहावं लागणार आहे. सातारा पोलिसांकडून काल मुंबई पोलिसांकडे गुणरत्न सदावर्तेंचा ताबा देण्यात आला होता. त्यानंतर काल ऑर्थर रोड कारागृहातून गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा घेण्यात आला होता. त्यानंतर त्यांना कोल्हापूर सत्र न्यायालयात (Kolhapur Sessions Court) हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता 25 एप्रिल पर्यंत गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडीत राहावं लागणार आहे.

कोल्हापूरच्या शाहूनगर पोलिसांनी गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेतल्यानंतर त्यांना कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. यादरम्यान आवाजांचे नमुने घेणे, युट्यूब तसेच इतर भाषणं चेक करण्यासाठी पोलिसांनी ही मागणी केली होती. युक्तीवादादरम्यान स्वतः गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतः कबूल केलं की, मी दिलेल्या काही मुलाखती रेकॉर्डवर आहेत. दरम्यान सर्व युक्तिवादानंतर न्यायालयाने सदावर्ते यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT