Sadavarte Sakal
महाराष्ट्र बातम्या

'भोगा आता कर्माची फळं'; परबांवरील कारवाईनंतर सदावर्तेंनी वाटले लाडू

एसटी कर्मचाऱ्यांची हळहळ आणि तळतळीचे हे परिणाम आहेत असं सदावर्ते म्हणाले आहेत.

दत्ता लवांडे

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानावर ईडीने सकाळी छापा टाकला. त्यानंतर त्यांच्या संबंधित सात ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अनिल परब यांच्यावर मुक्ताफळे उधळली आहेत.

(Gunratn Sadavarte On Anil Parab ED Raid)

"ही तर कर्माची फळं, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला आणि वाण नाही पण गुण लागला" अशी बोचरी टीका सदावर्ते यांनी परबांवर केली आहे. "एसटी कर्मचाऱ्यांची हळहळ आणि तळतळीचे हे परिणाम आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे पद दुसऱ्याला द्यायला पाहिजे होतं. हे तर कर्माची फळं आहेत." असं म्हणत सदावर्ते यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी लाडू वाटून आपला आनंद व्यक्त केला आहे.

"लवासा घोटाळा, सिंचन घोटाळा आणि आदर्श घोटाळा करणाऱ्या लोकांच्या सोबत राहिल्यावर हा गुण लागणारच, वाण नाही पण गुण लागतोच" असं म्हणत त्यांनी आता मनी लॉंडरिंग प्रकरणातील गुन्ह्याची उकल होणार आहे असं सांगितलं आहे. हा आनंद व्यक्त करताना त्यांच्यासोबत एसटी कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनीही एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त केला आहे.

त्याचबरोबर एका बॅंक घोटाळ्याच्या प्रकरणी जयश्री पाटील कोर्टात तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान आज सकाळी अनिल परब यांच्या निवासस्थानासहित सात ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांनी छापा टाकला होता. त्यामध्ये त्यांचे निकटवर्तीय संजय कदम यांचाही सामावेश होता. त्यानंतर सदावर्ते यांनी लाडू वाटून जल्लोष करत आनंद व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor Praises Modi : काँग्रेसवरील नाराजीच्या चर्चांमध्ये शशी थरूर यांनी केलं मोदींचं पुन्हा कौतुक!

Beed Crime: सचिन जाधवर मृत्यू प्रकरणात पोलिस तपासावर संशय; वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी कशासाठी?

Hapus Mango : पुण्यात हापूस दाखल! पेटीला १५ हजार; केशरचीही पहिली आवक

Sahar Sheikh: ‘मी घाबरणार नाही’; आरोपांवर AIMIM नगरसेविका सहर शेख यांचे ठाम उत्तर, नवीन वक्तव्य चर्चेत? म्हणाल्या...

T20 World Cup 2026 Update: बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानही ‘टी- 20’ विश्वचषकात नाही खेळणार?

SCROLL FOR NEXT