Hasan Mushrif,Sanjay Mandlik Esakal
महाराष्ट्र बातम्या

कागलच्या जनतेनं, शरद पवारांनी झोळी भरून दिलं; मुश्रीफांचा पलटवार

संजय मंडलिकांचा सल्ला मानून निवडणूक बिनविरोध केली; हसन मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात १५ वर्षांपासून मंत्री म्हणून काम करीत आहे. महाविकास आघाडीत दोन वर्षांपासून आहे. त्यामुळे मला कोणी काय दिले असेल तर ते कागलच्या (Kagal) जनतेने आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी झोळी भरून दिले आहे, असा पलटवार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्यावर केला.

जिल्हा बॅंकेच्या करवीर, गगनबावडा आणि शहरातील ठरावधारकांचा मेळावा महासैनिक दरबार हॉल येथे काल (ता.२९) झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी.एन.पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे, आमदार जयंत आसगावकर आदी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नेहमी कौतूक करत आलो आहे. २०१४ ला विधानसभा निवडणूक झाली.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अपेक्षीत आमदार विजयी झाले नाहीत. त्यामुळे भाजप-शिवसेना युती होणार हे स्पष्ट होते. पण गृहमंत्री अमित शहा यांनी उध्दव ठाकरे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्याचा दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे युती तुटल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहकार्याने ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मी दोन वर्षापासून मंत्री म्हणून काम करत आहे. आता कशाची अपेक्षा राहिलेली नाही. दुसरीकडे जिल्हा बॅंकेत हसन मुश्रीफ निर्णय घ्यायला कचरले, असे बोलले जात आहे. तर हे खर आहे. जिल्हा बॅंक शेतकऱ्यांची बॅंक आहे. ९ वर्ष प्रशासकीय कारकिर्दीत लोकांचे हाल झाले. आमचे पॅनेल मोठे झाले तर भाषणे होतील. बॅंकेची बदनामी झाली. याचा परिणाम बॅंकेच्या कारभारावर होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घ्यायला कचरलो. लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही बॅंक बिनविरोध करण्यावर भर देत राहिलो. राजकीय पादत्राणे बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मंडलिकांचा सल्ला आम्ही मानला

कागलचा शाहू कारखाना आणि जिल्हा बॅंक बिनविरोध कशी होते?, असा सवाल एका नेत्याने केला होता. खासदार मंडलिक यांनीच या दोन्ही निवडणुका बिनविरोध केल्या, त्यांचा सल्ला आम्ही मानला, या निवडणूका बिनविरोध करण्यात आम्ही यशस्वी झाल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT