Hasan Mushrif News 
महाराष्ट्र बातम्या

Hasan Mushrif ED : मनी लाँड्रिंग प्रकरणात हसन मुश्रीफांना दिलासा; ईडीच्या वकिलांनीच मागितली वेळ वाढवून

संतोष कानडे

मुंबईः अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झालेले आणि मंत्रिपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात कोर्टाने दिलासा दिला आहे.

25 जुलैपर्यंत हसन मुश्रीफ यांना अटकेपासूनचं संरक्षण कायम ठेवण्यात आलेलं आहे. EDच्या वकिलांनीच मुदत वाढवून मागितली आहे. एकीकडे तथ्य आणि पुरावे असल्याचा ED च्या वकिलांनी पूनरूच्चार केला असला तरी युक्तिवादासाठी वाढीव वेळ मागण्यात आलेली आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांना बघता ED च्या भूमिकेत बदल झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ईडीने (ED) मुश्रीफ यांच्याविरोधात दोन कारखान्यांतील व्यवहाराबाबत कारवाई सुरू केली आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या काही मालमत्तांवरही छापे टाकले आहेत. या पार्श्वभूमीवर अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

न्यायालयाने (Mumbai High Court) 6 जुलै रोजी त्यांना दिलेल्या अंतरिम संरक्षणात वाढ केली. तसेच ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश देत तपास अधिकाऱ्यांनी सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. आज पुन्हा त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलेले आहे.

दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयात मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. जावेद, आबिद आणि नावेद या तिन्ही मुलांना न्यायालयाने १९ जुलैपर्यंत दिलासा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT