hasan mushrif,ajit pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी मंत्री मुश्रीफ घेणार अजित पवारांची भेट

कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या सोडवण्यासाठी ग्रामविकास विभाग सकारात्मक

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ग्रामविकास विभागाशी संबंधित निर्णय सचिवांसोबत बैठक घेवून तातडीने मार्गी लावता येतील. त्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेतली जाईल. मात्र मागण्यांसाठी आर्थिक नियोजन करावे लागणार असेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची वेळ घेवून त्यांच्या सोबत बैठक घेण्याचे आश्‍वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांनी आज महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने बिंदू चौकात आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव तसेच संबंधित ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या सोडवण्यासाठी ग्रामविकास विभाग सकारात्मक निर्णय घेईल असे मुश्रीफांनी सांगितले. किमान वेतन, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून 10 टक्के कर्मचाऱ्यांची पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये नियुक्ती, 14 व 15 व्या वित्त आयोगाच्या निधीच्या आधारे सफाई कर्मचाऱ्यांना मेहनताना देणे आदी मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT