Uddhav Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackrey News : 'शिवसेनेने खंजीर खुपसला म्हणून शिवसेना फोडली, मग राष्ट्रवादीनं काय खुपसलं? ती का फोडली?', ठाकरेंचा सवाल

खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दैनिक ‘सामना’साठी मुलाखत घेतली

अंकिता खाणे (Ankita Khane)

Shivsena Podcast : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दैनिक ‘सामना’साठी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीवेळी उद्धव ठाकरेंनी आपली रोखठोक मतं मांडताना दिसून आले. यावेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपला रोखठोक सवाल केला आहे.

शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणता म्हणुन शिवसेना फोजली तर, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं? म्हणुन तुम्ही राष्ट्रवादी फोडलीत? राज्यात तुमचं सरकार होतं ना. शिवसेना फोडून आणि अपक्षांना सोबत घेऊन तुम्ही मजबूत सरकार स्थापन केलं होतं ना. मग तरीही राष्ट्रवादी का फोडलीत?, असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

तसेच, राष्ट्रवादी फोडण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर घोटाळ्याचे भयंकर आरोप केले होते. त्या आरोपांचं काय झालं? त्या घोटाळ्यांच्या पैशांचं काय झालं?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे. तर राष्ट्रवादीसोबत जाणं ही भाजपची कूटनीती आहे की मेतकूट नीती आहे हे मला माहीत नाही. पण या कूटनीतीला आता कुटून टाकण्याची वेळ आली आहे. नरक्षभक असतात तसे हे सत्ताभक्षक आहेत. सत्तालोलूपता सत्ताधाऱ्यांमध्ये आली आहे. त्यांना माणसं दिसेनाशी झाली आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

राज्यात डबल इंजिनचं सरकार आहे. ते वेगवान सरकार आहे काय? असा सवाल संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना केला असता, उद्धव ठाकरे म्हणाले कि, तुम्ही या सरकारला डबल इंजिन म्हणताय. मग तिसरं लागलं ते काय आहे? ते इंजिन नाहीये का? की डालड्याचा डबा आहे. मध्ये डबेच नाहीयेत, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT