Jitendra Awhad OBC Statement sakal media
महाराष्ट्र बातम्या

'पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा...', आव्हाडांना कसली भीती?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ''वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते. त्यांच्यावर ब्राम्हणवादाचा पगडा आहे. त्यामुळे ओबीसींवर माझा फारसा विश्वास नाही'', असं वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) केलं होतं. त्यानंतर भाजपचे नेते आक्रमक झाले होते. आता आव्हाडांनी ट्विट केलं असून 'पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा...' असा भीतीवजा इशारा त्यांनी पोलिसांना दिला आहे.

''माझ्या घरावर मोर्चा येणार आहे. त्यासाठी २ पुण्याहून मागविण्यात आलेल्या आहेत. एकाला सांगितले आहे कि तू माजीवाडा नाक्यावर उतर आणि दुसऱ्याला कॅडबरी जंक्शन जवळ उतरायला सांगितले आहे'', असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर राडा झाला होता. त्यामुळे आव्हाडांच्या ट्विटनंतर पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढविल्याचा माहिती मिळतेय. एक क्यू आर टी टीम आणि सिटी पोलीस तैनात करण्यात आले असून 100 पोलीस सध्या बंदोबस्तात आहेत. जितेंद्र आव्हाड सध्या घरी नाहीत. मात्र, दुपारपर्यंत पुन्हा घरी येणार आहेत, अशी माहिती आहे. तसेच आव्हाड समर्थकांनी देखील त्यांच्या घराबाहेर गर्दी केलेली आहे. पण, पोलिस कार्यकर्त्यांना अडवत आहेत.

आव्हाड वादाच्या भोवऱ्यात? -

ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने "सन्मान सावित्रीच्या लेकींचा" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आव्हाडांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी ओबीसी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. ''मंडल आयोग आला त्यावेळी आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं. पण, लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. त्यावेळी महार आणि दलित लढायला तयार होते. कारण, ओबीसींना कधीच लढायचं नसतं. ओबीसींवर ब्राह्मणवादाचा पगडा आहे. त्यांना हे माहिती नाही की, चार पिढ्यांपर्यंत आपल्या बापाला, आजोबाला, पणजोबाला देवळातही येऊ दिले जात नव्हते. हे तुम्ही विसरलात. त्यामुळे OBC वर माझा फारसा विश्वास नाही, असं आव्हाड म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

SCROLL FOR NEXT