korlaiee village sakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रातील कोर्लई गावात बोलली जाते वेगळीच भाषा

व्यवसायासाठी आलेल्या पोर्तुगीजांनी त्यावेळी या गावी आपला चांगलाच जम बसवला होता. हळूहळू येथील भाषा, खाद्यसंस्कृती व एकूणच जीवनशैलीवर पोर्तुगीजांचा प्रभाव दिसू लागला आणि यातूनच उदयाला आली कोर्लई क्रेओल पोर्तुगीज उर्फ नॉलिंग भाषा.

नमिता धुरी

मुंबई : आपण म्हणतो ‘जेवण- बिवण’ ते म्हणतात ‘कुमे- बिमे’. आपल्यासारखीच ‘च’, ‘त’ अशा व्यंजनांवर जोर देऊन बोलण्याची पद्धत. त्यांच्या व्यवसायांना सुद्धा पाटील, गवळी ही मराठी नावं. हे सगळं काही अगदी मराठमोळंच. फक्त त्याला इथे दिला जातो परदेशी तडका. ही कहाणी आहे रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीच्या संगमावर वसलेल्या टुमदार गावाची, कोर्लईची !

या गावात मराठी व पोर्तुगीज भाषेचा अनोखा मेळ पाहायला मिळतो. सुमारे चार शतकांपूर्वी व्यवसायासाठी आलेल्या पोर्तुगीजांनी त्यावेळी या गावी आपला चांगलाच जम बसवला होता. हळूहळू येथील भाषा, खाद्यसंस्कृती व एकूणच जीवनशैलीवर पोर्तुगीजांचा प्रभाव दिसू लागला आणि यातूनच उदयाला आली कोर्लई क्रेओल पोर्तुगीज उर्फ नॉलिंग भाषा.

korlaiee village

१५२० ते १७४० या तब्बल सव्वा दोनशे वर्षांच्या कालावधीत कोकण प्रांतात पोर्तुगीजांचे वर्चस्व होते. यातीलच एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे चौलबंदर व जवळचं कोर्लई गाव. पुढे चिमाजी अप्पा यांनी कर्तबगारीने हा प्रदेश पोर्तुगीजांच्या हातून सोडवला; मात्र काही पोर्तुगीज सैनिक यावेळी खाडीतून पोहून कोर्लई मध्ये आले आणि तिथेच स्थायिक झाले. वेगस, रोझारिया अशी अवघी चार- पाच कुटुंबं या गावात आली व मग पुढे तिथलीच झाली. ही मंडळी सुरुवातीला लॅटिन कालांतराने पोर्तुगीज व नंतर स्थानिक मराठी व पोर्तुगीज असा मेळ साधणारी भाषा बोलू लागली. सोयीने निर्माण झालेली नॉलिंग भाषा आजही कोर्लई गावात संवादासाठी वापरली जाते. मुख्यतः शेतात लावणी करताना, गवत काढताना, लग्नप्रसंगी विशेषतः हळदीच्या दिवशी कोर्लईकर आपल्या नॉलिंग भाषेतील गाणी आवर्जून गातात.


नॉलिंगवर मराठीचा प्रभाव

कोर्लई गावातील १ हजार रहिवासी वापरत असलेली नॉलिंग भाषा ही काळाच्या ओघात बरीच मागे सरत आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे नॉलिंग ही केवळ बोलीभाषा असून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या भाषेची लिपी उपलब्ध नाही. गावची वेस ओलांडताच इतरांशी संवाद साधण्यासाठी कोर्लईकरांना मराठीचाच आधार घ्यावा लागतो. परिणामी आज कोर्लईतील व्यवहाराची, सरकारी कामकाजाची अधिकृत भाषा ही मराठीच आहे. इतकंच नव्हे येथील चर्च मध्ये बायबल सुद्धा मराठी भाषेतच शिकवले जाते. यामुळे सध्या नॉलिंग भाषेतील विविध शब्दांवर मुख्यतः मराठीचा प्रभाव दिसून येतो.

मालवणी, कोकणी या अन्य बोलीभाषांप्रमाणे कोर्लई क्रेओल पोर्तुगीज उर्फ नॉलिंगलासुद्धा भाषा म्हणून मान व ओळख मिळावी असा कोर्लईकरांचा प्रयत्न आहे. जर आपणही भाषाप्रेमी असाल तर मराठीचा गोडवा जपून, पोर्तुगीज इतिहास गाठीशी धरून तयार झालेली ही भाषा ऐकण्यासाठी कोर्लईला एकदा आवर्जून भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT