नाशिक : गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आजोळ धुळे जिल्ह्यातील थाळनेर येथे आहे. बालपणी लता मंगेशकर याठिकाणी वास्तव्यास होत्या. लतादीदींच्या आजी याठिकाणी राहत असत. लता मंगेशकर यांचे रविवारी (ता.६) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांनी थाळनेर येथील त्यांच्या आजोळबद्दल २०१६ साली केलेले ट्विट चर्चेत आले आहे.
नमस्कार, थाळनेर हे माझ्या आईचे माहेर आहे. ‘तेथील माती सुद्धा मला सुंदर वाटते’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
गायसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे धुळ्याशी हेच नाते. त्याच्या गायनाने फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील संगीतप्रेमी मंत्रमुग्ध होत असल्याचे पाहायला मिळते. संगीतातील दैवत अशी लतादिदींची ओळख आहे. त्यांच्या आजींनाही संगीत, काव्य, कलेची आवड होती. लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीत, कला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातून शोकभावना उमटत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.