Loha Nagar Parishad election results in Nanded, showing the political setback faced by Ashok Chavan and the BJP’s defeat.
esakal
Ashok Chavan Faces Setback in Loha Nagar Parishad Elections: नांदेड जिल्हातील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपला फार मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणी भाजपने एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली होती, यावरून काँग्रेसने घराणेशाहीचा आऱोप करत जोरादार टीकाही केली होती. त्यामुळे या ठिकाणच्या निवडणुकीचा निकाल नेमका काय लागतो, याची सर्वांना उत्सुकता होती.
अखेर आज निवडणुकीचा निकाल समोर आला आणि भाजपला जोरदार धक्का बसला आहे. भाजपच्या सर्व सहा उमेदवारांचा पराभव झाला आहे. लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली होती.
तर, नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेव्हुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे या सर्वांना उमेदवारी दिली होती. या सर्वांना जनतेने नाकारलं आहे.
इथे नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. या ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत पहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा बाल्लेकिल्ला मानला जातो.
खरंतर एरवी भाजपकडून काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला जातो. मात्र लोहामध्ये एकाच कुटुंबातील चक्क सहा जणांना भाजपने उमेदवीरी दिल्याने, ही घराणेशाही नाही का? असा सवाल उपस्थित केला जात होता. अखेर निकालही त्याचप्रमाणे लागल्याचे समोर आले आहे.