Ekanath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

शेती ते निवडणुका; वाचा शिंदे सरकारने घेतलेले ९ महत्त्वाचे निर्णय

एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत इंधनावरील कर कमी करण्याचा महत्त्वापूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) इंधनावरील कर कमी करण्याचा महत्त्वापूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महागाईने होरपळणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजच्या बैठकीत पेट्रोल (Petrol) 5 तर, डिझेल (Desiel) 3 रुपयांनी स्वस्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा बोझा पडणार आहे. नेमकं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणकोणते निर्णय घेण्यात आले आहेत. याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. (Maharashtra Cabinet Meeting Decision)

  • पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय

  • राज्यात "स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान" राबविणार.

  • केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार

  • आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार

  • बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.

  • अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा.

  • नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने

  • राज्यातील ग्रामपंचायत सरपंचाची थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.

  • 18 ते 59 वर्ष नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या मोफत कोरोना बूस्टर डोसची केंद्राची योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT