ethanol sakal media
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra : इथेनॉल धोरण ठरविण्यासाठी समिती गठीत

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात नाबार्डचे अध्यक्ष व नाबार्डच्या मुख्यालयातील अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा झाली होती.

प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

माळीनगर (जि.सोलापूर) : इथेनॉल विषयक इथेनॉल निर्मिती व त्याची अंमलबजावणी याचे धोरण ठरविण्यासाठी राज्य सरकारने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठीत केली आहे. दोन महिन्यात या समितीला शासनास अहवाल सादर करावा लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात नाबार्डचे अध्यक्ष व नाबार्डच्या मुख्यालयातील अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा झाली होती. त्यावेळी राज्यात इथेनॉल धोरण ठरविण्याबाबत तसेच साखर कारखान्यांकडून शंभर टक्के इथेनॉल उत्पादन करण्याबाबतचा मुद्दा नाबार्डच्या अध्यक्षांनी उपस्थित केला होता. त्याअनुषंगाने सहकार विभागाने इथेनॉल धोरण ठरवावे,असे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मुख्य सचिवांनी निर्देशित केले होते. त्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे. राज्य सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, 'विस्मा'चे अध्यक्ष बी.बी ठोंबरे, व्हिएसआयच्या मद्यार्क तंत्रज्ञान व जैव इंधन विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. एस.व्ही पाटील, साखर सहसंचालक (उपपदार्थ) संजय भोसले यांचा समावेश समितीत आहे.

केंद्र सरकार व ऑईल मार्केटिंग कंपनी यांचे इथेनॉल निर्मिती व पुरवठा याबाबतचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीने साखर कारखाने व आसवणी प्रकल्प यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे, केंद्र सरकारप्रमाणे राज्य शासनाचे इथेनॉल निर्मिती व पुरवठ्याबाबत धोरण निश्चित करणे, राज्यातील साखर कारखाने व आसवणी प्रकल्प यांची क्षमता वाढ करून पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी आवश्यक आराखडा तयार करणे, याबाबतची कामे या समितीला पार पाडावी लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Disablity Day: दिव्यांगजनांना ३०० वरून १,००० रुपयांपर्यंत पेन्शन वाढ; योगींनी व्हीलचेअर वाटपासह केल्या अनेक योजना जाहीर

Latest Marathi News Live Update : नाशिक तपोवन वाचवा! झाडतोडीचा प्रश्न थेट केंद्र सरकारच्या दरबारात

Police Action Airport : चोरट्यांचा पण नादखुळा! पळून जाण्यासाठी केला विमानाचा वापर, शेवटी चोर ते चोर पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम

Nashik Municipal Election : नाशिक पालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; ६८.३४% नोंद, ४.६६ टक्क्यांची घट

Kolhapur Circuit Bench : २० वर्षांनंतर राष्ट्रगीत अवमान प्रकरणात मोठी कलाटणी; सर्किट बेंचचा हस्तक्षेप, ६ डिसेंबरचा निकाल स्थगित

SCROLL FOR NEXT