Chandrakant Patil
Chandrakant Patil  esakal
महाराष्ट्र

Chandrakant Patil रिटायर होणार, निवृत्तीचे संकेत

सकाळ डिजिटल टीम

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवृत्तीच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. 5-10 वर्ष काम करून थांबायचं आहे अस वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Maharashtra Politics BJP Chandrakant Patil retirement )

एका वृत्तसंस्थेशी बोलताना पुढील १०० वर्षात काय होईल माहिती नाही. त्यामुळे ५ ते १० वर्ष काम करुन थांबायचं आहे. असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. पुण्यामधील एस एन डी टी युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळा चर्चेला उधाण आलं आहे. पाटलांना निवृत्तीचे वेध लागले आहेत. अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

चंद्रकांत पाटलांचा राजकीय प्रवेश

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये महसूल मंत्री राहिलेल्या चंद्रकांत पाटील यांचा राजकीय क्षेत्रामधील प्रवास 2004 पासून सुरु झाला असला, तरी त्यांनी सलग 13 वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे भाजपचे एकनिष्ठ आणि मराठा चेहरा म्हणून पाहिले जाते. गिरणी कामगाराचा मुलगा ते दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री असा त्यांचा आजवर झालेला प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांनी आज फुटीर एकनाथ शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

चंद्रकांत पाटील यांचा जन्म 11 जून 1959 रोजी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. मुंबईतील गिरणगावात त्यांचे बालपण गेले. वयाच्या 18व्या वर्षापासूनच देशसेवेचे व्रत त्यांनी अंगीकारले. गिरणी कामगाराचा मुलगा ते राज्यातील सर्वात मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवेश आहे.

चंद्रकांत पाटील यांचे वडील बच्चू पाटील आणि आई गिरणी कामगार होते. त्यांचे वडील बच्चू पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील गारगोटीनजीक असलेल्या खानापूर येथील आहेत. आई वडील गिरणी कामगार असल्याने चंद्रकांत पाटील यांचा जन्म प्रभूदास चाळ, रे रोड, मुंबई या ठिकाणी झाला. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमध्येच झाले. शालेय शिक्षण त्यांचे राजा शिवाजी विद्यालयातून झाले, तर सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी बी.कॉमची पदवी प्राप्त केली.

अभाविपमध्ये सलग 13 वर्ष प्रचारक म्हणून काम केल्यानंतर संघामध्येही पश्चिम महाराष्ट्रची सहकार्यवाह म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडल्यानंतर त्यांची 2004 मध्ये राजकारणात एन्ट्री केली. मातृशाखा संघामध्ये केलेल्या कामाने भाजपमध्ये त्यांचा दरारा वाढत गेला. त्यामुळे सक्रीय राजकारणात उतरल्यानंतर 2004-2007 या कालावधीत त्यांच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि दक्षिण महाराष्ट्र विभाग प्रमुख अशी जबाबदारी सोपविण्यात आली.

पश्चिम महाराष्ट्रात केलेल्या कामाचा ठसा तसेच पक्षपातळीवरील प्रवेशानंतर चार वर्ष केलेल्या कामाची पोचपावती चंद्रकांत पाटील यांना 2008 मध्ये मिळाली. राज्यात 2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर भाजप शिवसेनेची निवडणुकीनंतर युती झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले. या मंत्रिमंडळात चंद्रकांत पाटील यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला.

मंत्रिमंडळातील समावेशानंतर सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम विभागासारख्या महत्त्वाच्या खात्यांचा पदभार चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला. जुलै 2019 मध्ये चंद्रकांत पाटलांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT