Weather update rain forcast continuous sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain : ऐन सणात पावसाचा खोळंबा; राज्यात 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

पुढील चार ते पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर कमी असणार आहे, मात्र..

सकाळ डिजिटल टीम

पुढील चार ते पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर कमी असणार आहे, मात्र..

सध्या राज्यात गणेशोत्सवाची धूम सुरु आहे. याच कालावधीत मुंबई हवामान केंद्राकडून (mumbai weather forecast) राज्यात (Maharashtra) पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात होता. दरम्यान, आता पुढील चार ते पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर कमी असणार आहे, अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असून १ सप्टेंबरपासून राज्यातील काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागात पाऊस होणार आहे. अकोला, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये पावसाची शक्यता असून या भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे वेळेनुसार शेतीच्या कामांचे नियोजन करावे असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना हा अलर्ट जारी केल्याने सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही प्रदेशात आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. मात्र, या दिवशी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. मुंबईत गुरूवारी कमाल तापमान ३३ आणि किमान तापमान २६ अंश सेल्सिअस असणार आहे. यावेळी आकाश ढगाळ आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवेचा दर्जा निर्देशांक 'चांगल्या' श्रेणीत ३१ वर नोंदवला गेला आहे.

पुण्यात कमाल तापमान २९ तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. यावेळी ढगाळ वातावरण असेल तर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 'समाधानकारक' श्रेणीत ५५ वर नोंदवला गेला आहे. पश्चिम घाटासह कोकणात या पावसाचा तुलनेत परिणाम कमी दिसेल अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीला पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

Latest Marathi News Live Update: राज ठाकरे मातोश्रीवर दाखल!

Raju Shetty: राज्य सरकार दलाली करतंय का: राजू शेट्टी

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

SCROLL FOR NEXT