Uddhav Thackeray News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena News: "ठाकरेंची नार्कोटेस्ट करा", मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यावरून शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट

...म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला; शिवसेनेच्या नेत्याने केला गौप्यस्फोट

सकाळ डिजिटल टीम

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा म्हणजे कुठल्या कंपनीकडून किती पैसे घेतले हे कळेल, असा आरोप शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंनी जनतेसाठी नाही, तर श्रीधर पाटणकर यांची चौकशी होऊ नये म्हणून राजीनामा दिला असल्याचा खळबळजनक आरोप सुहास कांदे यांनी केला आहे. हे सगळं सत्य बाहेर यावं म्हणूनच उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करणं गरजेचं असल्याचं सुहास कांदे यांनी म्हंटलं आहे.

उद्धव ठाकरेंची काल (रविवारी) मालेगाव येथे सभा पार पडली. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्यासोबत गेलेल्या सर्वच आमदारांना लक्ष केलं.

तसेच, अनेक गंभीर आरोप करत घणाघाती टीका देखील केली. यासंदर्भात शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुहास कांदे पुढे बोलताना म्हणाले की, "उद्धव ठाकरेंना माझं जाहीर आव्हान माझीही नार्को टेस्ट कराच, पण मी 10 कॉन्ट्रॅक्टर्सची नावं सांगतो, त्यांच्याकडून तुम्ही किती पैसे घेतले, त्याचीही टेस्ट होऊ द्यात.

मी फक्त चारच प्रश्न विचारतो, त्यांनी मला शंभर प्रश्न विचारावेत. माझ्या नार्को टेस्टमध्ये मी सरकार बदलीसाठी एक रुपया जरी घेतल्याचं आढळलं तर मी राजकारणातून संन्यास घेईल" असंही ते यावेळी बोलताना म्हणालेत.(Latest Marathi News)

तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला? हे जनतेला माहीत नसेल पण आम्हाला माहित आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा श्रीधर पाटणकरांची चौकशी थांबवण्यासाठी दिला.

त्यांच्यावरची अटकेची तलवार होती, जर यांना अटक झाली तर त्यांच्या चौकशीतून संशयाची सुई कोणाकडे जाईल, याच भीतीपोटी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला.", असं सुहास कांदे यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT