ssc exam esakal
महाराष्ट्र बातम्या

दहावीचा निकाल आज नाही, शिक्षणमंत्री लवकरच जाहीर करणार तारीख

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत यंदा दहावीचा निकाल जाहीर होण्याचा अंदाज आहे.

धनश्री ओतारी

जवळपास 17 लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, MSBSHSE, महाराष्ट्र एसएससी निकाल 2022 घोषित करण्यासाठी सज्ज आहे. मात्र, बोर्ड 15 जून रोजी महाराष्ट्र एसएससी निकाल 2022 जाहीर करणार नसल्याचे राज्य शिक्षणमंडळाने स्पष्ट केले आहे. (Maharashtra SSC Result 2022 Date and Time)

महाराष्ट्रात 12वीच्या निकालानंतर 10वीचा निकाल देखील अपेक्षित वेळेआधी जाहीर होईल अशी आस विद्यार्थी, पालकांना लागली आहे. एसएससी निकाल 2022 तारीख आणि वेळ नोटीस आज जारी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र बोर्डाचे १६ लाखांहून अधिक विद्यार्थी दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बोर्डाने उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. निकाल जाहीर झाल्यावर mahresult.nic.in वर प्रसिद्ध केले जातील.

दहावीचे निकाल १५ जूनपर्यंत जाहीर होणे अपेक्षित होते. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही आठवड्यांपूर्वी तशी माहिती दिली होती. मात्र, निकालाची तारीख निश्चित झाली नाही. आता 20 जूनपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी याची पुष्टी करण्यास नकार दिला.

महाराष्ट्र एसएससीचा निकाल MSBSHSE द्वारे साधारणपणे जून महिन्यात जाहीर केला जातो. एचएससीचा निकाल 2022 आधीच जाहीर झाला आहे. ट्रेंडनुसार, दहावीचा निकाल साधारणपणे बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक किंवा दोन आठवड्यांनी जाहीर केला जातो.

यंदाच्या महाराष्ट्र एसएससी परीक्षेसाठी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 2020 मध्ये, सुमारे 15,84,264 नोंदणी झाली होती आणि 15,75,103 हजर झाले होते. महामारीच्या पार्श्वभूमीवर 2021 च्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. 2020 च्या निकालांनाही उशीर झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

SCROLL FOR NEXT