Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Latur trends Amit Deshmukh Dhiraj Deshmukh 
महाराष्ट्र बातम्या

लातूर : देशमुखपुत्रांचे विलासरावांना विजयार्पण । Election Results 2019

सुशांत सांगवे

लातूर : काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या अमित आणि धीरज या दोन्ही पुत्रांनी लातूर शहर आणि ग्रामीण मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला. विजयाचा टप्पा गाठल्यानंतर दोघांनीही बाभळगावातील विलासबागेत जाऊन विलासराव देशमुख यांच्या स्मृतिस्थळीला भेट दिली. वडिलांना विजय अर्पण करीत देशमुख पुत्रांनी प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी रवाना झाले.

लातूर शहर मतदार संघातून अमित देशमुख यांना एक लाख ४ हजार ६६९ मते मिळवून विजय मिळवला. त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांना ६६,४५२ मते मिळाली. अंतिम निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. तर लातूर ग्रामीण मतदार संघातून धीरज देशमुख हे एक लाख १८ हजार २०८ मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांना १३ हजार ११३ मते मिळाली.

त्याचवेळी अहमदपुरात - क्लिक करा

विजय निश्चित असल्याचे पाहून अमित आणि धीरज दोघेही सायंकाळी पाच वाजता घराबाहेर पडले. या वेळी बाभळगावातील त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. पुष्पगुच्छ अन्‌ शुभेच्छांचा वर्षाव स्वीकारत अमित आणि धीरज या दोघांनी घरासमोरील मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर विलासबाग या विलासराव देशमुख यांच्या स्मृतिस्थळी ते सहकुटूंब पोचले. त्यांनी विलासरावांना आदरांजली अर्पण केली. 'विलासराव देशमुख अमर रहे...' अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत बाभळगावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Crime : कराडमध्ये पोलिसांच्या ताब्यातील आरोपी बेड्यांसह पसार; पुणे-बंगळूर महामार्गावर खळबळ!

Aravalli Case: अरावली वाचवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय! नवीन खाण परवान्यांवर बंदी; उद्योगाला मोठा झटका

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीच्या १९० धावा; रोहित शर्माच्या १५५ अन् विराट कोहलीच्या १३१ धावा! बघा ३ शतकांचा ५ मिनिटांचा Video

Dhaka bomb blast : भीषण बॉम्बस्फोटाने बांगलादेशचं ढाका हादरलं!; भर बाजारपेठेत अज्ञाताने फेकला 'क्रूड बॉम्ब'

UPSC Success Story : ग्रामीण शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी डॉ.भगवंत पवार यांचे UPSC CMS मध्ये ऑल इंडिया 25वी रँक!

SCROLL FOR NEXT