vidhan sabha 
महाराष्ट्र बातम्या

पहिला कल भाजपच्या बाजुने; युती 29, तर आघाडी 15 जागांवर पुढे | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, पहिला कल भाजपच्या बाजुने लागला आहे. महायुती 18 आणि महाआघाडी 14 जागांवर पुढे असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीच्या आजच्या निकालातून आजी-माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील दिग्गजांचे भवितव्य ठरणार आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षांतर करून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केल्याने यंदाची विधानसभा निवडणूक गाजली आहे. काही अपवाद वगळता यापैकी सर्व "आयारामां'ना सत्ताधारी पक्षांनी उमेदवारी दिली आहे, त्यामुळे या जागांच्या निकालाकडे लक्ष आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील माजी मंत्री नशीब अजमावत आहेत. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील सुरक्षित कोथरूड मतदारसंघ निवडल्याने सुरवातीला त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला होता, त्यामुळे या मतदारसंघाकडेही सर्वांचे लक्ष आहे. 

वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविलेल्या गोपीचंद पडळकर यांना भाजपने बारामतीतून अजित पवार यांच्या विरोधात उतरविल्याने ही लढत महत्त्वपूर्ण ठरली आहे. 

बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील लढत मराठवाड्यासह राज्यासाठी लक्षवेधी ठरली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने वरळी मतदारसंघाचा निकाल औत्सुक्‍याचा ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: तापमान आणखी वाढणार; घाटमाथ्‍यावर आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता,कसे असेल हवामान? जाणून घ्या

Swachh Survekshan:आनंदाची बातमी! 'स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत' कऱ्हाड देशात अव्वल; दिल्लीत हाेणार गौरव, सलग सहाव्यांदा पुरस्कार पटकावला

Pune News: वाकडमध्ये फ्लॅटसाठी विवाहितेचा छळ; सासरच्या व्यक्तींची शिक्षा कायम

मोठी बातमी! आता विद्यार्थी अन् प्राध्यापकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक; वर्गातच असणार बायोमेट्रिकची मशिन; परीक्षेसाठी ७५ टक्के उपस्थिती आवश्यक

Beet Sprouts Chilla: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि हटके हवाय? मग हा बीट-स्प्राऊट्स चिला एकदा ट्राय कराच!

SCROLL FOR NEXT