Mahashivratri 2024
Mahashivratri 2024 esakal
महाराष्ट्र

Mahashivratri 2024: कोंबड्यानं बांग दिली म्हणून शंकर पार्वती मातेचा मुक्काम कोल्हापूरातल्या या गावी झाला!

सकाळ डिजिटल टीम

करवीर काशी अशीही वेगळी ओळख कोल्हापूरला आहे. करवीर महात्म्यात या क्षेत्राला दक्षिण काशी असेही म्हटले जाते. या क्षेत्रात एक पौराणिक घटना घडली होती. जी कोल्हापूरातल्या या क्षेत्राला खास बणवते. कोल्हापूरातील वडणगे गावात शिळा रूपातील एक कोंबडा आहे. जो भगवान शंकर आणि माता पर्वतींच्या वाटेतील अडसर बनला होता. काय आहे ही कथा पाहुयात

कोल्हापूरपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असणारे व पंचगंगा नदीच्या काठावर असणारे वडणगे गाव शिव व पार्वती या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणी आपल्याला फक्त शिवाची मंदिरे व त्यामध्ये शिवलिंग पाहायला मिळेल परंतु करवीर या क्षेत्री आपल्याला शिव व पार्वती यांची स्वतंत्र मंदिरे आपल्याला पाहायला मिळतील.

प्रथम आपण पार्वती देवीची माहिती घेणार आहोत. सध्या जिथे वडणगे गाव आहे त्याच्या मुख्य चौकांमध्ये आपल्याला पार्वती देवीचे मंदिर आहे. या मंदिराला बेसॉल्ट खडकामध्ये ची कमान आहे. प्रवेश द्वारामधून आत गेल्यानंतर आपल्याला भव्य असा सभामंडप दिसून येतो सभामंडपाच्या दोन्ही बाजूस आपल्याला जुने कोरीव दगडी खांब दिसून येतात.

शारदीय नवरात्र,महाशिवरात्र,प्रत्येक सोमवार या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये येथे भाविक दर्शनासाठी येत असतात. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिरासमोर सुंदर दगडी दीपमाळ आहे.

तर, त्रंबकेश्वर तलावाच्या काठी वसलेले हे शिवमंदिर प्राचीन आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला शृंगी व भृंगी हे द्वारपाल आपल्याला दिसतात. मंदिराच्या गाभा-याच्या बाहेर श्री गणरायाची संगमरवरी मध्ये साधारण एक फूट उंचीची श्री गणेशाची मूर्ती आहे. मुख्य गाभारा मध्ये श्री शिवाचे लिंग आपल्याला पाहायला मिळेल.

पार्वती मंदिर व शिव मंदिर याच्यामध्ये एका चौथऱ्यावर आपल्याला कोंबड्याचे दर्शन होते. महाशिवरात्री मध्ये येथे या कोंबड्याची पूजा केली जाते.

या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते.

करवीर महात्म्यातील माहितीनूसार, कोल्हासुराचा वध करण्यासाठी आंबाबाईने भगवान शंकर आणि माता पार्वतीला आवतान दिले होते. ते स्विकारून भगवान शंकर दर्शन घ्यायला स्वतः भगवान शंकर आणि माता पार्वती काशी सोडून करवीरात येण्यासाठी निघाले.

मार्गभ्रमण करताना रात्रीच्यावेळीच प्रवास करायचा आणि सकाळचा कोंबडा आरवला की तिथेच मुक्काम करायचा. असे करत ते करवीराच्या वेशीच्या माळावर पोहोचले. भगवान शंकरांचा नंदी रंकाळ्यावर पोहोचला तरी देव आणि देवी वडणगेच्या माळावरच होते.

देव आपला वध करायला येत आहेत असे समजताच कोल्हासुराने देवांच्या वाटेत अडसर निर्माण करायचे ठरवले. देव माळावरून निघत होते तेव्हा राक्षसाने कोंबड्याचे रूप घेतले. कोंबड्याने बांग दिली आणि सकाळ होण्याची चाहुल लागली. त्याचवेळी देवी आणि देव होते तिथेच थांबले. वडणग्यात ते मूर्ती रूपात स्थीर झाले.

करवीर माहात्म्य ग्रंथांत बत्तीसाव्या अध्यायात या क्षेत्राचा उल्लेख उमा त्र्यंबकेश्वर असा आहे. या गावात महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते. गावातील लोक मोठ्या उत्साहात जत्रा करतात. आणि कोंबड्याची पूजा करतात. कारण, कोंबड्यामुळेच भगवान शंकर आणि माता पार्वती वडणग्यात स्थायिक झाले. त्यामुळे ते वडणगे भूमीला पवित्र मानतात. कोंबड्याची पूजा करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT