गाळप  Sakal
महाराष्ट्र बातम्या

महाविकास आघाडीचा निर्णय! अतिरिक्त ऊस गाळप, कारखान्यांना १०४ कोटींचे अनुदान

राज्यातील २३ जिल्ह्यातील १२३ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५० लाख मे.टन अतिरिक्त उसाचे गाळप केले आहे. कमी-अधिक प्रमाणात ऊस असतानाही कारखान्यांनी गाळप सुरु ठेवल्याने त्यांना प्रतिटन दोनशे रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यापोटी कारखान्यांना १०४ कोटी रुपये दिल्याची माहिती साखर आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील २३ जिल्ह्यातील १२३ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५० लाख मे.टन अतिरिक्त उसाचे गाळप केले आहे. अजूनही ५६ कारखाने सुरुच आहेत. कमी-अधिक प्रमाणात ऊस असतानाही कारखान्यांनी गाळप सुरु ठेवल्याने त्यांना प्रतिटन दोनशे रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यापोटी कारखान्यांना १०४ कोटी रुपये दिल्याची माहिती साखर आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

यंदाच्या गाळप हंगामात राज्यभरातील २०० कारखाने सुरु होते. तरीदेखील शेतकऱ्यांनी १८ महिन्यांहून अधिक काळ सांभाळलेला ऊस वेळेवर तुटून गेला नाही. उन्हाच्या तडाख्यात उसाचे वजन घटले, अवकाळीमुळे ऊस तोडणीला विलंब झाला. अशावेळी काही शेतकऱ्यांना उसाचा अख्खा फड पेटवून दिला. त्यावेळी शेतकऱ्यांना काहीतरी अनुदान मिळेल, अशी आशा होती. पण, गाळप हंगाम संपूनही आणि उसाचे क्षेत्र कमी असतानाही कारखान्यांनी गाळप सुरु ठेवून अतिरिक्त उसाचे गाळप केले. त्यामुळे त्या कारखान्यांना प्रतिटन २०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. ऊस तोडणी व वाहतूक खर्च म्हणून हे अनुदान असल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. आतापर्यंत राज्यातील १२३ कारखान्यांनी अतिरिक्त उसाचे गाळप केले आहे. १ मेनंतर गाळप झालेला ऊस अतिरिक्त समजण्यात आला आहे. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, नगर, जालना या जिल्ह्यांमधील एकूण ५६ कारखान्यांचे गाळप अजूनही सुरुच आहे. राज्यात अजूनही उसाची लागवड सुरुच असल्याने आगामी वर्षात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून १ ऑक्टोबरपासून आगामी गाळप हंगाम सुरु केला जाणार आहे.

गाळप हंगामाची सद्यस्थिती
उसाचे एकूण क्षेत्र
१३.६७ लाख हेक्टर
आतापर्यंतचे गाळप
१,३१८ लाख मे. टन
साखर उत्पादन
१३६ लाख मे.टन
गाळप बंद केलेले कारखाने
१४४
अजूनही कारखाने सुरु
५६

राज्याला लागते २८ लाख टन साखर
राज्यासाठी दरवर्षी २८ लाख टन साखर लागते. घरगुती व विविध उद्योगांसाठी त्याचा वापर होतो. अतिरिक्त उसाप्रमाणेच यंदा साखरेचेही अफाट उत्पादन झाल्याने आतापर्यंत ९४ लाख मे.टन साखर विविध देशांमध्ये निर्यात करण्यात आली आहे. परदेशात साखरेला चांगला दर मिळत असल्याने यंदा कारखान्यांना केंद्र सरकारकडून निर्यात अनुदानदेखील मिळालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

Maharashtra Live News : सांगोल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ; 84 लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

कॅन्सरशी लढताना मनीषा कोईराला ठरली आधार! सोनाली बेंद्रेने केला मोठा खुलासा, म्हणाली...

Farmers Success: थेंबाथेंबातून फुलविली द्राक्षबाग;अंबेजवळगे येथील सुनीता बिरंजे यांचा जलव्यवस्थापनाचा आदर्श

SCROLL FOR NEXT