Maratha Reservation Devendra Fadnavis Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : देवेंद्र फडणवीसांनी आजपर्यंत मराठा आरक्षण का दिलं नाही? समाज विचारणार जाब

मराठा समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी, चीड निर्माण होऊ लागली आहे.

रूपेश कदम

माण तालुक्यातील सकल मराठा समाज हा राजकारणविरहित एकत्रित येऊन उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सामोरा जाणार आहे. मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘जाब विचार’ आंदोलन करण्यात येणार आहे.

दहिवडी : फक्त भाजपच (BJP) मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देऊ शकतो, सत्तेवर आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे विरोधात असताना म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही? याचा जाब सकल मराठा समाज देवेंद्र फडणवीस यांना विचारणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या माण तालुका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या (Maratha Community) बैठकांना वेग आला असून, आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. माण तालुक्यातील मराठा समाजाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खर्चिक शेती, कारखानदारी नसल्यामुळे खासगी क्षेत्रात रोजगार उपलब्ध नाही.

आर्थिक स्थिती बेताची असल्याने शिक्षण घेताना आरक्षणाअभावी भरमसाट फी भरणे शक्य होत नसल्याने उच्च शिक्षण घेणे अवघड होऊन बसले आहे. नाइलाजास्तव शेतमजूर, ऊसतोड कामगार म्हणून काम करावे लागत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हीच मराठा समाजाला आरक्षण देणार, अशी ग्वाही दिली होती. मात्र, आठ महिने होऊन गेले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. त्यामुळे मराठा समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी, चीड निर्माण होऊ लागली आहे.

आरक्षण मिळाले तर मराठा समाजाचे अनेक प्रश्‍न मार्गी लागून आर्थिक परिस्थिती बदलू शकेल. प्रगतीची कवाडे खुली होतील, अशी आशा इथल्या मराठा तरुणांना आहे. त्यामुळे माण तालुक्यातील सकल मराठा समाज हा राजकारणविरहित एकत्रित येऊन उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सामोरा जाणार आहे. मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘जाब विचार’ आंदोलन करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याला आमचा कोणताही विरोध नाही; परंतु त्यांनी आमचे म्हणणे ऐकावे. जर त्यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही, प्रशासनाने आम्हाला म्हणणे मांडण्यास संधी दिली नाही, तर आमच्यापुढे एका वेगळ्या आंदोलनाशिवाय पर्याय नसेल, असे सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

‘क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये वेळ न घालवता राज्य सरकारने मराठा समाजाला गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार तत्काळ मागास घोषित करून ५० टक्केच्या आत संविधानिक आरक्षण द्यावे, अन्यथा आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल.’

-संदीप पोळ, याचिकाकर्ते.

‘सत्तेवर आल्यानंतर तत्काळ आरक्षण देऊ, अशी भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी सत्ता नसताना घेतली होती. आज सत्ता येऊन अनेक दिवस झाले तरी आरक्षणासंदर्भात काही निर्णय होत नाही. सरकारने ठोस पावले उचलून आरक्षणासाठी भूमिका घ्यावी, अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलन करू.’

-सूरज कदम, शेनवडी (ता. माण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirav Modi Extradition : नीरव मोदीला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग; CBI अन् EDचे संयुक्त पथक लंडनला जाणार!

Baramati Election : बारामतीच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात; निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात धाव!

IND vs SA, ODI: 'रोहित आणि मी अजूनही संघासाठी...', विराट मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर स्पष्टच बोलला; पाहा Video

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत पक्षप्रवेशावरून मतभेद होण्याची शक्यता!

Indigo Flight Chaos : विमानाच्या गोंधळामुळे आमदार रस्त्यावर; नागपूर अधिवेशनासाठी निघाले मोटारीने!

SCROLL FOR NEXT