gautami patil  esakal
महाराष्ट्र बातम्या

Gautami Patil: 'फक्त तिने अश्लील हावभाव करू नये'...मराठा महासंघाचा गौतमीच्या पाटीलला सल्ला

गेल्या काही दिवसांपासून गौतमीच्या पाटील आडनावावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

धनश्री ओतारी

पाटील आडनावाला आमचा विरोध नाही, फक्त तिने अश्लील हावभाव करू नये, असं मराठा महासंघाच्या नेत्या अनुराधा ठाकरे यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून गौतमीच्या पाटील आडनावावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पण गौतमी आपल्या आडनावावर ठाम आहे. अशातच आता मराठा महासंघाकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. (maratha mahasanghas reaction on gautami patil surname controversy )

मराठा महासंघाची भूमिका काय?

अनुराधा ठाकरे या जालन्यात बोलत होत्या. पाटील ही पदवी आहे. अनेक समाजात पाटील हे आडनाव लावलं जातं. पाटील हे आडनाव कुणाचीही मक्तेदारी नाही. त्यामुळे गौतमीच्या पाटील आडनावाला आमचा विरोध नाही, फक्त तिने अश्लील हावभाव करू नये, जेणेकरून युवा पिढीला त्रास होणार नाही, असं स्पष्ट आणि परखड मत मराठा महासंघाच्या नेत्या अनुराधा ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.(Latest Marathi News)

शिवाय त्यांनी गौतमीच्या पाटील आडनावाला समर्थन देखील दिलं आहे.

संभाजीराजे छत्रपतींनी देखील या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महिलांनी आपले गुण व कतृत्व दाखवायला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे.

मराठा समाजातच नाही तर अनेक समाजातील लोक सुद्धा पाटील आडनाव लावतात. त्यामुळे पाटील हे आडनाव नसून तो किताब आहे. कलाकारांना सुरक्षा मिळायला पाहिजे, असं मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं आहे. (Latest Marathi News)

गौतमीच्या पाटील आडनावावरुन वाद?

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या पाटील आडनावावरून वाद निर्माण झाला आहे. गौतमी पाटील हिचे खरे आडनाव पाटील हे नसून ते चाबूकस्वार असे आहे असे मराठा संघटनांनी जाहीर केले होते. काही मराठा संघटनांनी गौतमीला पाटील आडनाव वापरण्यास मनाई केली आहे. गौतमीने पाटील आडनाव वापरल्यास तिचे कार्यक्रम बंद पाडू असा इशारा देण्यात आला आहे.(Entertainment News in Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Veer Sugar Factory: किसनवीर साखर कारखान्यात कामगारांचा उद्रेक, अनेक वर्षांपासून पगार नाही; मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील विरोधात संताप

IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

SCROLL FOR NEXT