Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : गेवराईचे आमदार लक्ष्मण पवारांनी दिला राजीनामा; पत्रामध्ये काय म्हटलंय?

Maratha Reservation: Gevrai MLA Laxman Pawar resigns; What did the letter say?

संतोष कानडे

मुंबईः भाजप नेते तथा गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन उग्र रुप धारण करीत असताना अनेक नेते राजीनाम्याचा पावित्र्यात आहेत.

रविवारी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ठिकठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. विशेषतः राजकारणातील श्रीमंत मराठ्यांविरोधात गरीब मराठ्यांचा आक्रोश दिसून येत आहे.

सोमवारी सकाळी बीडमधल्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी हल्ला केला. सुरुवातीला घरावर प्रचंड दगडफेक करीत त्यांची गाडी जाळली आणि घरालादेखील आग लावली. प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे यांच्याबद्दल केलेल्या एका विधानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने आंदोलक संतप्त झाल्याचं बघायला मिळालं.

दरम्यान, बीडच्याच गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांना त्यांनी राजीनामा पत्र लिहिले आहे.

राजीनामा पत्रामध्ये काय म्हटलं?

आमदार लक्ष्मण पवार यांनी राजीनाम्यामध्ये म्हटलंय की, मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. मराठा आरक्षणासाठी माझा पाठिंबा असून आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.

असा मजकूर लिहित आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा पाठवला. आणखी किती आमदार आणि खासदार राजीनामा देतात, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT