Kunbi Caste Certificate esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : कुणबीच्या 20 हजार नोंदी शिंदे समितीला सापडण्याची शक्यता; 15 ते 20 लाख लोकांना होणार फायदा

माजी न्या. संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल आज (ता.३१) मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारला जाणार आहे.

दीपा कदम

शिंदे समितीने खूप कमी कालावधीत १ कोटी ७३ लाख ७० हजार ६५९ नोंदी तपासल्या आहेत.

मुंबई : मराठवाड्यातील शंभर-दीडशे वर्षांपूर्वीच्या मराठा कुणबी (Maratha Kunbi) नोंद असलेल्या २० हजारांपेक्षा अधिक कुटुंबाच्या नोंदी शिंदे समितीला सापडण्याची शक्यता असून त्याचा फायदा १५ ते २० लाख लोकांना होणार आहे.

कुटुंबाचा विस्तार होत असल्याने ८ ते १० पेक्षा अधिक पिढ्यांच्या झालेल्या विस्तारामुळे अधिक कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला (Maratha Reservation) कुणबी जात प्रमाणपत्र (Kunbi Caste Certificate) देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी न्या. संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल आज (ता.३१) मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारला जाणार आहे.

त्यानुसार ११ हजार ५३० कुणबी जातीच्या नोंदी सापडल्या आहेत. मात्र, त्यामध्ये सतत वाढ होत असून या नोंदी २० हजारपर्यंत असण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांचे प्रमाणीकरण व्हायचे आहे. या नोंदींचा फायदा १५ ते २० लाख लोकांना होणार आहे.

Maratha Reservation Shinde Committee

शिंदे समितीने खूप कमी कालावधीत १ कोटी ७३ लाख ७० हजार ६५९ नोंदी तपासल्या आहेत. त्यामध्ये कुणबी जातीच्या नोंदीचे प्रमाण ११ हजार ५३९ म्हणजेच ०.०६६ इतकेच अल्प असले आहे. मात्र, त्यामध्ये सातत्याने वाढ होत असून हे प्रमाण २० हजारांपर्यंत जाण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. शिंदे समिती येत्या काळात महत्त्वाचे १२ अभिलेख तपासणार असून त्यामधूनच २० हजारांपेक्षा अधिक नोंदी सापडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway : पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी! नांदेड आणि हरंगुळ एक्स्प्रेस गाड्या २६ जानेवारीपासून हडपसरवरून सुटणार, पहा नवीन वेळापत्रक

IPL 2026: राजस्थान रॉयल्सला मिळाली द्रविडची रिप्लेसमेंट! जडेजाला संघात घेतल्यानंतर जाहीर केला मोठा निर्णय

Latest Marathi Breaking News : बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित

Mumbai Crime: अंधेरीत विद्यार्थ्याला श्वानासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं, ब्लॅकमेल करत बळजबरीनं लिंगबदल करायला लावलं; तृतीयपंथीयांकडून अत्याचार

Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; पार्टटाइम जॉब आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाने ९८ लाखांची फसवणूक

SCROLL FOR NEXT