Minister Subhash Desai Clarification About Maratha Reservation Lawyer Minister Subhash Desai Clarification About Maratha Reservation Lawyer
Minister Subhash Desai Clarification About Maratha Reservation Lawyer Minister Subhash Desai Clarification About Maratha Reservation Lawyer  
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासंदर्भातील 'त्या' बातम्या खोट्या; सुभाष देसाईंची माहिती

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विधिमंडळ अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील याचिकांमध्ये राज्य शासनाची बाजू मांडणारे वकील बदलल्याच्या समाजमाध्यमामध्ये तसेच काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या तथ्यहीन व दिशाभूल करणाऱ्या असल्याचे स्पष्टीकरण विधानपरिषदेत सभागृह नेते सुभाष देसाई यांनी दिले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात वकील बदलल्याच्या बातम्या आल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करुन याबद्दल सांगितले असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले होते. कुठल्याही परिस्थितीत मराठा आरक्षण संबंधातील वकील बदलले जाणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे खा. संभाजीराजे यांनी ट्विट करत सांगितले होते. 

राष्ट्रवादीकडून 'या' दोन नेत्यांना विधानपरिषदेचे गिफ्ट 

संभाजीराजे म्हणाले, 'मराठा आरक्षण मिळवण्याकरिता समाजाने खूप मोठा त्याग केला आहे. अनेक दशकांपासून हा लढा चालू आहे. कित्येकांनी आपले बलिदान सुद्धा दिलं. आजही मराठा आरक्षणाची केस सर्वोच्च न्यायालयात लढवली जात आहे. मी स्वतः प्रत्येक तारखेला न्यायालयात उपस्थित राहत असतो. आज एक केस लागली असताना लक्षात आलं की मुकुल रोहतगी आणि नाडकर्णी या जेष्ठ वकिलांना बाजू मांडण्यास नाकारण्यात आले. मी तात्काळ मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवले. नवीन सरकारी वकील साहेब आले आहेत, त्यांनी काहीएक विचार करून यांना थांबवले, हे लक्षात आले. मी माझी चिंता व्यक्त केली. 

उद्धव ठाकरेंचा संभाजीराजेंना फोन; पत्राची घेतली तात्काळ दखल

यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ दखल घेत, यावर माझ्याशी संपर्क केला. आणि त्यांनी पूर्ण विश्वास दिला की मराठा आरक्षणाच्या संदर्भात कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही. त्यामुळे समाजाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो, आणि ते असेच सहकार्य करतील असा विश्वासही व्यक्त करतो, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT