rain google
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील अनेक भागात मुसळधार, आजही पावसाचे ढग कायम राहणार

पुढील २ दिवस विजांच्या कडकडाटा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुढील २ दिवस विजांच्या कडकडाटा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यंदा वेळेआधीच मान्सून दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली होती. दरम्यान, काल मान्सूनने अरबी समुद्रात एंट्री केली असल्याचे हवामान खात्यानं सांगितलं होतं. (IMD) या माहितीनुसार दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी 19 मे ते 21 मे दरम्यान विजांच्या कडकडाटा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कालपासून या प्रदेशातील काही ठिकाणी पावसाने रिपरिप सुरु केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, साताऱ्याच्या काही भागांत पाऊस झाला असून पुण्यातल्या काही भागातही तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. जालना जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये काल संध्याकाळी अचानक विजेचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला आहे. त्यामुळे या पावसामुळे शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे.

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातीय या भागांत पाऊस सुरु असून पावसाच्या नोंदीसंदर्भात भारतीय हवामान खात्याने माहिती दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रदेशात पावसाची नोंद झाली आहे ती पुढीलप्रमाणे, मोहोळ -19, सांगोला - 23, माढा - 2.4, हातकणंगले - 48, गडहिंग्लज - 35, राधानगरी - 19, आजरा - 68, शिरोळ - 48, शाहूवाडी - 9, पन्हाळा - 40, गगनबावडा - 47, चंदगड - 55. कोकण प्रदेशातील - खेड - 8, लांजा - 13, चिपळूण - 18, देवरुख - 8, राजापूर - 3, मंडणगड - 0, पारनेर -21, राहुरी -1.6, पाऊसाची नोंद झाली आहे.

आजची पावसाची स्थिती

आज केरळ आणि तामिळनाडूजवळ पावसाचे ढग दिसत नाहीत. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रसह मराठवाडा आणि संपूर्ण गोव्यासह कर्नाटकच्या बहुतांश भागांत आणि अरबी समुद्रावर काही भागात ढगाळ वातावरण आहे. तसेच मुंबई आणि ठाण्यातही अंशत: ढगाळ वातावरण असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayan Ahmed: एक सल्ला, नंतर 'तो' मॅसेज अन् सापळा... अयान अहमदनं तरुणींना जाळ्यात कसं ओढलं? पडद्यामागचा सल्लागार लव्हगुरू कोण?

RCB vs DC Live: विराट कोहली अपयशी ठरला, वैभव सूर्यवंशीचा 'पॉवर'फुल विक्रम थोडक्यात वाचला! १५ वर्षीय फलंदाज वरचढ ठरला

Inflation Rise: IMD चा कमी पावसाचा इशारा! शेती संकटात? महागाई वाढणार का?

Latest Marathi News Live Update: ठाण्यातील टेंभी नाका आनंद आश्रम येथे शिवसेना जाहीर निषेध आंदोलन

बिग बॉस मराठीच्या घरात गायक अभिजीत सावंतची ENTRY ! घरातील स्पर्धकांना केलं गाण्याने मंत्रमुग्ध ..

SCROLL FOR NEXT