monsoon weather update  sakal
महाराष्ट्र बातम्या

पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा - IMD

यामुळे मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

यामुळे मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरु आहे. काल हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असून काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे काही भागांत पावसाची जोरदार संततधार सुरु आहे. दरम्यान, आता पुढील ४८ तासात महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (monsoon weather update)

हवामान खात्याने या संदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे. आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, रायगडसह कोकणसह संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, कोकणासह राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महत्वाच्या कामाव्यतरिक्त घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या महिन्याच्या सुरवातीपासून तापमानात बदल होत असल्याने कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. जून महिना पूर्णत: कोरडा गेला आहे. मात्र जुलै महिन्यात पाऊस सुरु झाला आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्यानं नाशिक, पुणे आणि कोकणात रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत या जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कामाव्यतरिक्त बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhor Solar Machinery Vandalism: भोंगवली वादग्रस्त प्रकल्पावर रात्रीच्या वेळी जाळपोळ कामगारांना मारहाण

Ajit Doval Gen Z : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांनी Gen Z वर केले वक्तव्य; पुण्यातील कार्यक्रमात युवकांना उद्देशून भाषण

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांनी माफी न मागता माफ कसं करता? संजय राऊत

माझ्या कृतीची लाज वाटते, जे बोलले ते माफीलायक नव्हतं; PM मोदींना शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थीनीचा माफिनामा

Amit Shah : "गुजरातमध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा नरेंद्र मोदी CM..."; अमित शहांनी सांगितला अजित डोवाल यांच्याशी पहिल्या भेटीचा किस्सा

SCROLL FOR NEXT