शेतकरी अडचणीत sakal
महाराष्ट्र बातम्या

फडणवीस सरकारमध्येच सर्वाधिक शेतकरी आत्महत्या! 22 वर्षातील आकडा 38 हजारांवर

राज्यात 19 मार्च 1986 रोजी चिलगव्हाण (ता. महागाव) येथे पहिली शेतकरी आत्महत्या झाली. मागील 22 वर्षांत राज्यातील तब्बल 38 हजार 168 शेतकऱ्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे. पण, तत्कालीन फडणवीस सरकारच्या सत्ता काळात (ऑक्‍टोबर 2014 ते ऑक्‍टोबर 2019) 14 हजार 961 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात 19 मार्च 1986 रोजी चिलगव्हाण (ता. महागाव) येथे पहिली शेतकरी आत्महत्या झाली. मागील 22 वर्षांत राज्यातील तब्बल 38 हजार 168 शेतकऱ्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे. पण, तत्कालीन फडणवीस सरकारच्या सत्ता काळात (ऑक्‍टोबर 2014 ते ऑक्‍टोबर 2019) 14 हजार 961 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर महाविकास आघाडीच्या सव्वादोन वर्षांत (डिसेंबर 2019 ते फेब्रुवारी 2022) पाच हजार 878 शेतकऱ्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसनमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

शेतकऱ्यांच्या नशिबी एखादे वर्ष सुवर्णकाळ ठरते तर बहुतेकवेळा त्यांना दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर, अवकाळी, वादळी वारे अशा संकटांचाच सामना करावा लागतो. त्यातच मागील दोन वर्षांत कोरोनाशी त्यांचा मुकाबला सुरु आहे. इतरांप्रमाणे आपलीही मुले उच्चशिक्षित व्हावीत, अधिकारी होऊन शासकीय सेवेत दाखल व्हावीत, मुलीला चांगला नवरदेव मिळावा एवढेच त्यांचे स्वप्न असते. पण, ज्यावेळी त्यांचे ते स्वप्नही पूर्ण होणार नसल्याची खात्री झाल्यानंतर ते आत्महत्येचा शेवटचा पर्याय निवडतात. तत्पूर्वी, बॅंकांचे कर्ज नैसर्गिक संकटांमुळे परतफेड करता येत नाही. दुसरीकडे थकबाकीत गेल्याने पुन्हा कर्ज मिळत नाही, त्यामुळे खासगी सावकारांचा दरवाजा ठोठावावा लागतो. नैसर्गिक आपत्तीत लाखो रुपयांचे नुकसान होऊनही हजारात भरपाई मिळते. कारखान्याला ऊस जाऊनही 14 दिवसांत एकरकमी एफआरपी मिळत नाही. शेतीपिकाला हमीभाव नाही, शासकीय योजनांच्या लाभासाठी अनेक कागदपत्रे देऊनही वेळेत लाभ मिळत नाही, अशी आवस्था आहे. कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रात आत्महत्यांचे प्रमाण अत्यल्प असून तुलनेने विदर्भ, मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. मागील पाच वर्षांतील प्रत्येक वर्षीच्या तुलनेत या सव्वादोन वर्षातील आत्महत्येचा आलेख उतरता आहे.

तीन लाखांचे मिळणार बिनव्याजी कर्ज
दीड लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज बिगरव्याजी मिळत होते. शेतकऱ्यांसमोरील अडचणींचा विचार करून राज्य सरकारने आता तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून त्या कर्जावरील व्याज राज्य सरकार भरणार आहे. बॅंकांनीही सिबिल पाहून कर्ज द्यायला सुरवात केल्याने शेतकऱ्यांना त्या कर्जाची परतफेड केली तरच पुन्हा कर्ज मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात बॅंकांची थकबाकी कमी होईल आणि पुन्हा कर्जमाफीची गरज भासणार नाही, असा सरकारला विश्‍वास आहे.

युती सरकारची पाच वर्षे
वर्ष आत्महत्या
ऑक्‍टोबर 2014 682
2015 3263
2016 3080
2017 2917
2018 2761
ऑक्‍टोबरपर्यंत 2019 2258
एकूण 14,961

महाविकास आघाडीचे सव्वादोन वर्षे
वर्ष आत्महत्या
डिसेंबर 2019 242
2020 2547
2021 2743
फेब्रुवारीपर्यंत 2022 346
एकूण 5,878

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT