Devendra Fadnavis on Nana patole Devendra Fadnavis on Nana patole
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्राचे मंत्री गुजरातचे हितचिंतक झालेत; नाना पटोलेंचे टीकास्त्र

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे नेत गुजरातचे (Gujarat) नेतृत्व केव्हा पासून करू लागले. धारावीच्या पूर्ण विकासाचा विचार ते का करीत नाहीत? असा टोला काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लगावला. आज त्यांनी ट्विट करत निशाणा साधला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर निशाणा साधताना पटोले म्हणाले, धारावी पुनर्विकास प्रकल्पाकरिता रेल्वेची ४५ एकर अतिरिक्त जमीन मिळवण्यासाठी राज्य सरकारने केंद्राला ८०० कोटी रुपये दिले. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी ८०० कोटी दिले अस समजायचं. पण, २०० कोटी जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत आम्ही जागा देणार नाही असे स्टेटमेंट फडणवीस यांनी केले आहे. असा आडमुटेपणा जर भाजपाचा असेल तर देशाचा विकास कसा होणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच

धारावीच्या झोपडपट्टीचा मुद्दा उपस्थित करताना पटोले म्हणाले, महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे नेत गुजरातचे नेतृत्व केव्हा पासून करू लागले. जनतेच्या हितासाठी काही नियम आपण शिथिल करतो. याला सरकार म्हणतात. मात्र भाजप ज्या पध्दतीने वागत आहे हे बरोबर नाही. मोदी सरकारमधील महाराष्ट्राचे मंत्री कधीपासून गुजरातचे हितचिंतक झालेत? धारावीच्या पूर्ण विकासाचा विचार ते का करीत नाहीत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women's World Cup : पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली! आता एक चूक हरमनप्रीत कौरच्या संघाला पडू शकते महागात

Neena Kulkarni : अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पुरस्कार; अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शनातील योगदानाबद्दल सन्मान

Latest Marathi News Live Update : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

Pune Crime : झोमॅटो डिलीव्हरी बॉयला मारहाण, तीन आरोपी ताब्यात

Satara Crime : 'ती' गरोदर आहे, कुणाला कळलं तर? काकाने अल्पवयीन मुलीचा गळा आवळून केला खून; मृतदेह पुरला कोयना धरणाच्या किनारी

SCROLL FOR NEXT