Pravin Darekar
Pravin Darekar सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र

प्रवीण दरेकरांना हायकोर्टाचा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मुंबई हायकोर्टानं (Mumbai High Court) दिलासा दिला आहे. बोगस मजूर प्रकरणी हायकोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. यामुळं महाविकास आघाडीला (MVA Govt) धक्का बसल्याचं बोललं जात आहे. (Mumbai High Court granted Bail to Praveen Darekar In Mumbai Bank case)

बोगस मजूर प्रकरणी सध्या प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याच प्रकरणात दरेकरांना मुंबई हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान, दरेकरांच्या वकिलांनी माहिती देताना सांगितलं की, "आम्ही आधीपासूनच सांगत होते की याप्रकरणी जो गुन्हा दाखल केला आहे, त्यानुसार केस उभी राहू शकत नाही. कोर्टानं या केस संदर्भातील मुद्देही न ऐकता दरेकरांना कोठडीत चौकशीची गरज नाही, हे ठरवलं. त्यामुळं हायकोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला"

या केसमध्ये दाखल झालेला एफआयआर राजकीय हेतूनं प्रेरित आहे. तेच आता कोर्टानंही मान्य केलं आहे. यामध्ये सन २०१५ पासून मुंबै बँक प्रकरणात जे इतर दोन एफआयआर दाखल आहेत त्यामध्ये २०१५ ते २०२१ पर्यंत तपास झाला आहे. पण तरीही महाविकास आघाडी सरकारनं ही फाईल पुन्हा उघडली. त्यामुळं हे स्पष्टपणे दिसतय की हा गुन्हा केवळ राजकीय हेतूनं प्ररित आहे, असंही दरेकर यांच्या वकिलांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT