Anil parab sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! कर्मचारी मारहाण प्रकरण भोवलं; आमदार परबांसह 25 जणांविरुध्द गुन्हा, चार जण अटकेत

महानगरपालिका कर्मचारी मारहाण प्रकरणी (Mumbai Municipal Corporation) महत्वाची बातमी समोर आलीये.

सकाळ डिजिटल टीम

सध्या वाकोला पोलिसांनी वेगवेगळ्या टीम बनवून फरार आरोपींची धरपकड सुरू केली आहे.

मुंबई : महानगरपालिका कर्मचारी मारहाण प्रकरणी (Mumbai Municipal Corporation) महत्वाची बातमी समोर आलीये. महापालिकेच्या एच पूर्व कार्यालयातील असिस्टंट इंजिनियर पाटील यांना काल शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती.

याप्रकरणी आता मुंबईच्या वाकोला पोलिसांनी (Vakola Police) शिवसेना गटाचे आमदार आणि विभाग प्रमुख अॅड. अनिल परब (Anil Parab) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनिल परब यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी इतर फरार असलेल्या आरोपींचा वाकोला पोलीस शोध घेत आहेत. मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कलम 353, 332, 506 आणि 34 भा.द.वी नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर वाकोला पोलिसांनी माजी नगरसेवक सदा परब, माजी नगरसेवक हाजी हलीम खान, शाखाप्रमुख संतोष कदम,शाखाप्रमुख उदय दळवी यांना अटक केली.

सध्या वाकोला पोलिसांनी वेगवेगळ्या टीम बनवून फरार आरोपींची धरपकड सुरू केली आहे. या मारहाणीनंतर वाकोला पोलिसांनी 13 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. मात्र, सीसीटिव्ही कॅमेरे तपासल्यानंतर यातील काही जणांना सोडून देण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Namibia historic win Video : नामिबियाच्या धडाकेबाज बॅट्समनने रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर मारला कडक चौकार अन् घडवला इतिहास!

Uddhav Thackeray : सरकारचे ‘पॅकेज’ म्हणजे सर्वांत मोठी थाप; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना एक लाखाची मदत द्या

Pimpri News : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानीला आळा बसणार

Namibia beat South Africa: आरारारारा...खतरनाक! नामिबियाने चक्क दक्षिण आफ्रिकेला केलं पराभूत; क्रिकेटमध्ये घडवला नवा इतिहास

Palghar News : पालघरच्या प्रारूप मतदार यादीमध्ये झोलंमझाल; मनसे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

SCROLL FOR NEXT