Nitin Desai Death 
महाराष्ट्र बातम्या

Nitin Desai Death: "नितीन देसाई आत्महत्या हा विषय ठाण्याशी संबंधित", नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Sandip Kapde

Nitin Desai Death :  प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. बुधवारी सकाळी त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. नितीन देसाई यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे सेट डिझाइन केले होते. त्यांच्या निधनाने चाहते आणि सेलिब्रिटींचे डोळे पाणावले. आज विधानसभेत देखील हा मुद्दा गाजला.

नितीन देसाई यांना कर्ज देणाऱ्या खासगी कंपनीच्या भूमिकेची चौकशी केली जाईल, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. गुरुवारी विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

फडणवीस म्हणाले, कंपनीने जास्त व्याज आकारले की नाही हे तपासात कळेल. देसाई यांच्यावर दबाव आणला जात होता आणि ते तणावाखाली होते का? देसाई यांच्या स्टुडिओचे संरक्षण कसे करता येईल किंवा सरकारकडून ताब्यात घेता येईल, याबाबत कायदेशीर बाबींचा विचार केला जाईल, असे फडणवीस म्हणाले.

यावेळी काँग्रेसनेते नाना पटोले यांनी धक्कादायक आरोप केला आहे. नाना पटोले म्हणाले, "हा ठाण्याचा प्रश्न आहे. ठाण्यातील अनेक लोक यात सहभागी आहेत. नितीन देसाई यांच्याबरोबर खूप राजकारणी लोक होते. ठाण्यात त्यांच्या एका प्रोजेक्टचे काम सुरू होते."

"आता कर्जामुळे आत्महत्या केली की अजून काही. पण हा विषय ठाण्याशी निगडित आहे. यात कोण कोण सहभागी आहे हे आज न उद्या समोर येईल. आम्ही आमच्याकडून माहिती गोळा करणे सुरू कले आहे. आम्ही तुम्हाला हिंट दिली आहे. आत्महत्या का केली हे ठाण्याशी संबधित आहे", असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

APL 2025: ६,६,६,४,४,४... पी अर्जुन तेंडुलकरचा १२ चेंडूत धुमाकूळ! स्फोटक फलंदाजीनं वेधलं लक्ष

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: मराठवाड्यात मोठी धरणे आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दिशेने

SCROLL FOR NEXT