Nana Patole - Sushilkumar Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole: तालुकाध्यक्ष पदावरुन काँग्रेसमध्ये वाद; थेट माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदेना नेमलं निरीक्षक

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अन्‌ तालुकाध्यक्षांचा पेटला वाद

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यातील काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निवडीच्या वादावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तोडगा काढला आहे. आता प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष श्‍याम उमाळकर व माजी आमदार रामहरी रूपनवर हे त्यासंबंधीचा अहवाल तयार करून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना देतील. त्यानंतर श्री. शिंदे यांचा निर्णय अंतिम राहील, असेही प्रदेशाध्यक्षांनी यावेळी स्पष्ट केले आहे. पंढरपुरातील या बैठकीत ताकद कमी पण पुढारपण जादा करणाऱ्यांना बाहेरच ठेवण्यात आले होते.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी ऑनलाइन सभासद नोंदणीचे कारण पुढे करून ज्यांनी जास्त नोंदणी केली, त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड केल्याचे सांगत यादीच प्रसिद्ध केली. पण, त्यावेळी पूर्वीच्या तालुकाध्यक्षांना अंधारातच ठेवले गेले. आम्ही पक्षासाठी इतकी वर्षे काम करूनही जिल्हाध्यक्षांनी चुकीच्या पद्धतीने निवडी केल्याची खंत जुन्या तालुकाध्यक्षांनी प्रदेश पातळीवर मांडली.

तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनाही सांगितली. त्यानंतर सूत्रे हलली आणि निवडीला स्थगिती मिळाली. तरीपण, स्थगिती वगैरे काहीच नसल्याचे जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याने पुन्हा संभ्रम निर्माण झाला होता. नवीन तालुकाध्यक्षांनाही निवडीचे पत्र नाही आणि जुन्यांना काढून टाकल्याच्या देखील सूचना नाहीत, अशी स्थिती झाली होती.

त्यातून पक्षाच्या संटनात्मक बांधणीपेक्षाही अंतर्गत वाद, गटबाजीच जास्त वाढली होती. त्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपूर दौऱ्यावर आल्यावर तोडगा काढून तो वाद मिटवला आहे. आता प्रदेश उपाध्यक्षांचा अहवाल व श्री. शिंदे यांच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शिंदे साहेबांचा आदेश येईपर्यंत आम्हीच अध्यक्ष!

सध्याचा काळ पक्षासाठी कठीण असून, जुन्या-नव्यांना एकत्रित घेऊन जिल्हाध्यक्ष धवलसिंह पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचे प्रयत्न करतील, अशी आशा होती. पण, त्यांनी सभासद नोंदणी सर्वाधिक केलेल्यांना तालुकाध्यक्ष केल्याचे सांगून नवीन यादी प्रसिद्ध केली. पण, भाजपमधून काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या एका कार्यकर्त्याला माढ्याचे तालुकाध्यक्ष केले होते.

ना सभासद नोंदणी ना ‘भारत जोडो’त सहभाग, तरीसुद्धा अध्यक्षपद! अशी चर्चा होती. दुसरीकडे, जुन्या तालुकाध्यक्षांना बदलल्याचे प्रदेश स्तरावरून काहीच सांगण्यात आले नव्हते आणि नवीन लोकांना निवडीचे पत्र देखील नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. आता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे जोपर्यंत सांगत नाहीत, तोपर्यंत आम्हीच तालुकाध्यक्ष, अशी भूमिका काही पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT