File photo of Narayan Rane 
महाराष्ट्र बातम्या

''शिवसेना सो़डल्यानंतर आई-वडिलांच्या पुण्याईमुळे वाचलो''

मला संपवण्यासाठी अनेकांना सुपाऱ्या देण्यात आल्या होत्या. यामध्ये देशातल्या आणि देशाबाहेरील गँगश्टर्सचा समावेश होता.

सकाळ डिजिटल टीम

Narayan Rane Press Conference : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर अनेक नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली असून, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी 2005 मध्ये ज्यावेळी शिवसेना सोडली त्यावेळी मला संपवण्यासाठी अनेकांना सुपाऱ्या देण्यात आल्या होत्या. यामध्ये देशातल्या आणि देशाबाहेरील गँगश्टर्सचा समावेश होता. मात्र, मी त्यावेळी यावर काहीच बोललो नाही. कारण या परिस्थितीला तोंड द्यायला समर्थ होतो. या सर्व परिस्थीतीत वाचलो तो केवळ माझ्या आई-वडिलांच्या पुण्याईमुळे वाचलो असे म्हणत ज्यांना सुपाऱ्या दिल्या त्या व्यक्तीदेखील माझ्याशी योऊन बोलल्याचा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला आहे.

पद गेल्यानंतर मराठी माणून आठवला

पुढे बोलताना राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर मराठी माणसाची आठवण झाली. मी त्यांना गेल्या 40 वर्षांपासून ओळखत असून त्यांच्या अंगात दृष्टपणा आणि कपटीपणा भरलेला आहे. सत्तेतील अडीत वर्षात ठाकरेंनी कोणतेच काम केलेले नसून, आजरपण आणि मातोश्री या दोन्हीमध्येच त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ गेला अशी टीकादेखील त्यांनी केली. आज सामनामध्ये प्रकाशित झालेली ठाकरेंची मुलाखत ही ठरवलेल्या प्रश्नांवर होती असा आरोपही नारायण राणेंनी यावेळी बोलताना केला.

ठाकरेंना पदावरून पायउतार केल्यानंतर संजय राऊत मनातून खूश असून, ठाकरेंची मुलाखत म्हणजे राऊतांनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. संजय राऊत म्हणजे बनावट पत्रकार असून, त्याची लायकी नाही, त्याला काही दर्जा नसल्याचा घणाघातही राणे यांनी केला आहे. राऊत उद्धव ठाकरेंना त्यांच्या तालावर नाचवत असल्याचेही राणे म्हणाले. शिवसेनेचा वारसा रक्ताने नाहीतर विचाराने चालत असतो. शिवसेनेत असताना आईवडिलांचं ऐकलं नाही अन् आता काय म्हणता शिवसेना आमची आहे? उद्धव ठाकरेंनी प्रेम, विश्वास दिला नाही, तो एकनाथ शिंदेंनी दिला. खरं तर संजय राऊतांनी शिवसेना फोडली असून, या कामगिरीनंतर राऊत मनातून खूश आहेत असेही राणे यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT