Narayan Rane  sakal
महाराष्ट्र बातम्या

Narayan Rane : बजेट सादर करणाऱ्या जयंत पाटलांसाठी राणेंनी शिवला होता खास सूट

चक्क नारायण राणेंनी जयंतराव पाटलांसाठी शिवला होता बंद गळ्याचा कोट, वाचा काय होतं प्रकरण

सकाळ डिजिटल टीम

Narayan Rane : आजपासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनावरुन अनेक जुन्या राजकीय आठवणींना उजाळा मिळतो. अशीच एक आठवण नारायण राणेंबाबची आहे.

राणेंनी नेहमी राजकारणापलीकडे मैत्री जपली. असाच एक किस्सा एका अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आहे. जेव्हा नारायण राणे विरोधी पक्ष नेतेपदी असताना त्यांनी थेट अर्थमंत्र्यांसाठी बंद गळ्याचा कोट शिवला होता. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (narayan rane gifted coat to ncp leader jayant patil for wearing on Budget session )

1999 मध्ये शिवसेना आणि भाजपच्या युतीचं सरकार सत्तेतून पायउतार झालं आणि त्यावेळचे मुख्यमंत्री नारायण राणें यांचं मुख्यमंत्री पद गेलं. यानंतर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं. त्यावेळी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री होते जयंतराव पाटील तर नारायण राणे विरोधी पक्षनेतेपदी होते.

सत्ता गेल्यानंतर विरोधी पक्षावर प्रचंड ताण होता. मात्र एवढ्या मोठ्या विरोधी पक्षनेते पदावर असतानाही राणे मात्र नेहमीच सत्ताधारांसोबत सैलपणे वागत होते. मैत्री जपत होते.

हा किस्सा आहे 2002-03 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा. सगळीकडे अधिवेशनाची लगबग सुरू होती. जयंतराव पाटील हे त्यावर्षी अर्थसंकल्प मांडणार होते. त्यावेळी विरोधी पक्षात असतानाही राणे आणि पाटलांची मैत्री मात्र चर्चेत होती.

जयंतराव पाटील अर्थसंकल्प मांडणार असल्याने अधिवेशनाच्या आधीच्या दिवशी राणेंनी जयंतराव पाटलांना फोन केला आणि त्यांना विचारले की उद्या बजेट मांडणार आहात ? मग कोणता ड्रेस घालणार?' त्यावर पाटील म्हणाले, "नेहमीचा पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि तशीच पँट!"

अर्थसंकल्पीय अधिवेशनात जयंतरावांनी सुटाबुटात अर्थसंकल्प मांडावा, असे राणेंना मनोमनी वाटले. त्यांनी पुन्हा जयंत पाटील यांना फोन करुन त्यांच्या 'पीएचाही मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर त्यांनी पाटलांच्या 'पीए शी बोलून राहण्याचा पत्ता घेतला आणि लगेच राणेंनी 'गाना' तील टेलरला पाटलांकडे पाठविले आणि त्यांचं माप घेऊन पाच-सहा तासांत जयंत पाटलांना काळ्या रंगाचा आणि बंद गळ्याचा सूट पाठवला.

विरोधी पक्षात असतानाही राणेंची मैत्री जपण्याची ओढ यावरुन दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘हेरा फेरी’चा हिरो आता बिझनेसमन! सुनील शेट्टीने जावई आणि ल्योकासोबत उभारला नवीन व्यवसाय, महिलांसाठी खास वस्तू आणली बाजारात

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले, ७ मृत्युमुखी, २०० पेक्षा जास्त जखमी, भारतातही जाणवले धक्के

ICCपेक्षा BCCIकडून जास्त बक्षीस! भारतीय महिला संघासह सपोर्ट स्टाफ होणार मालामाल

DCB Bank Job : जिल्हा बँकांच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य, राज्य शासनाचा निर्णय; सत्तर टक्के जागा राखीव ठेवण्याचे आदेश

Nagpur Fake Teacher ID Scam: ६७२ बोगस शिक्षकांकडून होणार वेतनाची वसुली? सायबर पोलिस करणार न्यायालयात मागणी

SCROLL FOR NEXT