navneet rana sakal
महाराष्ट्र बातम्या

"दम असेल तर माझ्याविरोधात लढा"; नवनीत राणा लढवणार मुंबई महापालिका निवडणूक

शिवसेनेच्या विरोधात प्रचार करण्यासाठी आपण मुंबई महानगरपालिकेची निवडणुक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : नवनीत राणा या आज लीलावती रुग्णालयातून बाहेर आल्या आहेत. बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. आम्ही काय गुन्हा केला ज्यामुळे आम्हाला अटक करण्यात आली असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

तसेच शिवसेनेच्या विरोधात प्रचार करण्यासाठी आपण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या निवडणुकीत आपण शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार आहोत असं त्या माध्यमांना बोलताना म्हणाल्या आहेत.

मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या वादानंतर झालेल्या घडामोडीनंतर चर्चेत असलेल्या नवनीत राणा यांना आज लीलावती रुग्णालयातून सुटका मिळाली आहे. बाहेर आल्यावर त्यांनी ठाकरे सरकारला आमची काय चूक होती असा सवाल करत, "तुम्ही आम्हाला हनुमान चालीसाच्या कारणावरुन अटक करत असाल तर मी चौदा दिवसंच काय चौदा वर्षे तुरूंगात राहायला तयार आहे." असं त्या म्हणाल्या.

"तुम्हाला आज पद आहे पण तुम्ही जनतेसमोर येऊन लढवून दाखवा, मी तुम्हाला चॅलेंज करते. मी तुमच्या विरोधात लढणार आहे. जनता तुम्हाला सांगेल की राम आणि हनुमानाचा विरोध करणाऱ्यांचं काय होतंय." असं म्हणत त्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे.

"तुमच्यामध्ये दम असेल तर तुम्ही माझ्या विरोधात लढवून दाखवा, तुम्हीच मतदारसंघ निवडा त्या मतदारसंघातून मी तुमच्या विरोधात लढणार आणि एका महिलेची ताकद काय आहे हे मी तुम्हाला दाखवून देणार आहे आणि निवडून येणार." असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

"दोन पिढ्यांपासून मुंबई महानगरपालिका त्यांच्या हातात आहे पण आता पुढच्या निवडणुकांत रामभक्त आणि जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. ज्या पद्धतीने शिवसेनेने भ्रष्टाचाराची लंका इथे उभारली आहे, त्या लंकेला संपवण्यासाठी मी लढणार आहे. या भ्रष्टाचारी लंकेला संपवण्यासाठी मी कुठेही उभं राहायला तयार आहे." असं त्या म्हणाल्या.

"त्यांनी माझं घरही पाडलं तरी माझ्या मुखातून हनुमान आणि रामाचं नाव जाणार नाही." असं त्या यावेळी माध्यमांना बोलताना म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune NCP BJP MLC : पुणे विधानपरिषदेच्या जागेवरुन रस्सीखेच, राष्ट्रवादी -भाजपमध्ये संघर्षाची चिन्हे; भाजप नेत्यांने आकड्यांचा खेळ मांडला

India’s Fastest Man! भारताच्या गुरविंदरवीर सिंगने १०.०९ सेकंदात पार केले १०० मीटरचे अंतर; राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धेचे तिकीट मिळवले

Mumbai Rain: पुढील काही तास महत्त्वाचे! मुंबईसह 'या' भागात कोसळणार मुसळधार, हवामान विभागाचा अलर्ट

Jalna Unseasonal Rain : कुंभार पिंपळगाव परिसरात वादळी वारे, गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा

Pune Census News : पुणे महापालिकेचा जनगणना कर्मचाऱ्यांना इशारा : निष्काळजी प्रगणकांवर ‘जनगणना कायदा १९४८’ अंतर्गत कठोर कारवाईची तयारी

SCROLL FOR NEXT