Ajit Pawar
Ajit Pawar 
महाराष्ट्र

अजित पवारांना आज शपथ नाही; राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री ठरला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजीनामा देऊन पुन्हा पक्षात परतल्यानंतर त्यांना आज (गुरुवार) होणाऱ्या शपथविधीवेळी शपथ देण्यात येणार नाही. तर, राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील शपथ घेण्याची शक्यता आहे. 3 डिसेंबरनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसला देण्यात आल्याने त्या पदी कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा सुरू झाली होती. राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून जयंत पाटील यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, अजित पवार यांना हे पद देण्यात यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. परंतु, पक्षाविरुद्ध बंड केल्याने त्यांच्याविरुद्ध काहीसा नाराजीचा सूरही आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आपले मत जयंत पाटील यांच्या पारड्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे. 

महाविकास आघाडीचे नेते व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. मंत्रिपदांच्या वाटपाचेही सूत्र ठरले असून, त्यानुसार उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला, तर विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात येणार आहे. शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी केली असून, राज्यभरातून एक लाख शिवसैनिक येणार आहेत. शिवाय, देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील सोहळ्यासाठी बोलाविण्यात आले आहे. 

शपथविधी समारंभापूर्वी बुधवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाली. तीत प्रामुख्याने मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं अर्धशतक, मिचेलसोबत चेन्नईचा डाव सावरला

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT