NCP Jayant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil: 'अहिल्यादेवींच नाव देण चांगलचं पण...', अहमदनगरच्या नामांतराबद्दल जयंत पाटलांची भूमिका

राज्यातील दोन शहरांची नावे बदलल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवीनगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यातील दोन शहरांची नावे बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल, 'अहमदनगर' जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवीनगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा केली. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे काल जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी जमलेल्या जनसमुदायाच्या साक्षीने त्यांनी हे जाहीर केले आहे. सरकारच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रंसने देखील समर्थन दिले आहे.(Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या सोलपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 'मी पहिल्यांदा अर्थमंत्री असताना गावासाठी निधी देत होतो. आताही ते चांगलंच विकसित झालं आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी गावामुळे त्या जिल्ह्याला मोठं महत्व आहे त्यामुळे सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे, पण मी यावर अधिक काही बोलणार नाही असंही ते पुढे म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्याने चिन्हासाठी राष्ट्रवादीला आता परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राबाहेर ‘घड्याळ’ हे पक्षचिन्ह निवडणुकीत वापरायचे असेल तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागेल. असं मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मोठं वक्तव्य केलं त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 'आम्ही कर्नाटकात आधी निवडणूक लढवली घडयाळ चिन्हावर 9 ठिकाणी उमेदवार उभे राहिले होते. तरीही आम्ही देशपांडे यांच्या सूचना लक्षात घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू असं पाटील म्हणालेत. तर आम्ही लवकरच आमचा राष्ट्रीय दर्जा परत मिळवण्याचा प्रयत्न करू असंही ते म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे ही आगामी निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची माहिती समोर आली आहे त्यावर पत्रकारांनी जयंत पाटील यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, 'याबाबत तुमच्याशी अमोल कोल्हे बोलले असतील तर मला माहीत नाही आमची काही चर्चा झालेली नाही असंही ते म्हणालेत. तर अमोल कोल्हे ही आमचे चांगले उमेदवार आहेत. त्यांचं संसदेतील कामही उत्तम आहे असंही ते पुढे म्हणालेत. तर निवडणुका लागल्या की कोण कोण इच्छुक आहे ते आम्ही जाणून घेऊ असंही ते म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठरलं! तीन आठवडे चालणार यंदाचं पावसाळी अधिवेशन, २२ जूनपासून होणार सुरुवात, कोणते मुद्दे राहणार चर्चेत?

Video : युझवेंद्र चहलचे २९ चेंडूंत शतक! पीटरसनने दिलेलं चॅलेंज २१ चेंडू राखून पूर्ण केलं, पण त्यात Twist आहे... ; मोडला एबीचा विक्रम

पाकिस्तानी हवाई दलाचं विमान कोसळलं, २ पायलटचा मृत्यू; घटना CCTVत कैद

Latest Marathi News Live Update : वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची टीका

Sanchita Ugale: छावा चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलं जीवन, नालासोपाऱ्यातील राहत्या घरात आढळला मृतदेह; DDLJ मध्येही काम केलं होतं

SCROLL FOR NEXT