NCP Sharad Pawar phone call to CM eknath shinde over MPSC exam student protest  
महाराष्ट्र बातम्या

MPSC Student News : MPSC विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटणार? शरद पवारांकडून CM शिंदेंना फोन, म्हणाले…

सकाळ डिजिटल टीम

राज्य लोकसेवा आयोगाकडून एमपीएससी परीक्षेच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या बदलांविरोधात विद्यार्थी आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी याविरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येत आंदोलन देखील केले होते. यानंतर आज शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

शरद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून त्यांचा विद्यार्थ्यांचा प्रश्न समोपचाराने मिटवू. वेळ काढून मला सांगा. याबद्दल सह्याद्रीवर मिटींग ठेवा. मी विद्यार्थ्यांचे पाच प्रतिनिधी बोलवतो. तुमच्या जे कोणी असतील त्यांना बोलवा असे शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगितले.

एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होणार भेट होणार आहे. आज याच संदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी फोन वरून चर्चा केली असल्याची माहिती कॅांग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, शरद पवार, अतूल लोंढे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित असणार आहेत. असेही त्यांनी सांगितले.

काय झालं होतं?

पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Examination) परीक्षेची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. आयोगाने गेल्या वर्षी अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत केलेला बदल २०२५ पासून लागू करण्यात यावा, अशी मागणी खरत विद्यार्थ्यांनी रस्त्यावर निदर्शने केली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गेल्या वर्षी अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला होता. २०२३ पासून एमपीएससीच्या परीक्षाही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा होणार आहेत.

हा निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमासंदर्भात हे आंदोलन करण्यात आले. दरवर्षी हजारो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात. यादरम्यान परीक्षेचं पध्दत बदल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mill Workers House: गिरणी कामगारांचे स्वप्न पूर्ण होणार! 'या' जागेवर उंच निवासी इमारती उभारणार; बीएमसीचा मोठा निर्णय

Bride Viral Video: त्याला शेवटचं भेटायचंय... लग्नाच्या २ तास आधी प्रियकराला भेटायला गेली नवरी, पण तिथं नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये ‘वाईन टुरिझम’ला नवी उभारी; पर्यटन, शेती आणि उद्योगाचा संगम

Movie Review : कैरी - सहजसुंदर अभिनयाला नयनरम्य दृश्‍याचा साज

Shaktipith Expressway : शक्तिपीठ महामार्गावर मोठा ट्विस्ट; फडणवीसांनी जाहीर केली नवी अलायमेंट, सोलापूर, सांगली ते कोल्हापूर नवा मार्ग

SCROLL FOR NEXT